खानदेशात कोरडवाहू कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

जळगाव : खानदेशात प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोठे नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत आहेत.
Outbreak of Bond larvae on dryland cotton in Khandesh
Outbreak of Bond larvae on dryland cotton in Khandesh

जळगाव : खानदेशात प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. मोठे नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान होत असल्याने क्षेत्र रिकामे करून कृत्रीम जलसाठे उपलब्ध असलेले  शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करीत आहेत. 

कोरडवाहू कापूस जळगावच्या पश्चिम पट्ट्यात अधिक असतो. त्यात अमळनेर, पारोळा, पाचोरा, चोपडा यांचा समावेश आहे. धुळ्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा येथेही कोरडवाहू कापसाचे क्षेत्र अधिक आहे. खानदेशात एकूण सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. सर्वच तालुक्यांमध्ये कापूस प्रमुख पीक आहे.

दोन वेचण्या कोरडवाहू कापूस पिकात झाल्या आणि गेल्या महिन्यातच गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला. सध्या बोंडे उमलत नाहीत. अर्धवट उमललेली बोंडे वेचणीला खर्च प्रतिक्विंटल एक हजार रुपयांवर येत आहे.  मजूर मिळत नाहीत. कापसाला हवा तसा दर नाही. एकरी फक्त एक ते दोन क्विंटल उत्पादन काही शेतकऱ्यांना आले आहे.

अशातच गुलाबी बोंड अळीने पिकाला ग्रासल्याने शेतकरी संकटात आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी कापूस उत्पादक नजीकच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेत आहेत. तसेच  ज्यांच्याकडे कृत्रीम जलसाठे उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांनी क्षेत्र रिकामे करून त्यात गहू, मका पेरणी सुरू केली आहे. या स्थितीत क्षेत्र झपाट्याने रिकामे होईल. कारण, अळीचा प्रादुर्भाव सर्वत्र आहे. 

पंचनामे करण्याची मागणी

गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी नव्याने उपाययोजना करणे खर्चिक आहे. खर्च करणे सध्या शक्य नाही. कारण, हाती पैसा नाही. बोंड अळीसंबंधी पंचनामे करून पुढे नुकसान भरपाई मिळण्याची मागणीदेखील केली जात आहे. 

यंदा दोन-तीन वेचण्यानंतरच गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला आहे. कोरडवाहू कापसाचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मजुरी खर्च वाढला आहे.  - नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द (जि. जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com