उसावर ‘चाबूक काणी’चा प्रादुर्भाव 

जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यातील ऊस पिकावर ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे.
Outbreaks of whiplash on sugarcane
Outbreaks of whiplash on sugarcane

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा व लोहारा तालुक्यातील ऊस पिकावर ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. 

यंदाच्या गाळ हंगामासाठी उस्मानाबाद जिल्ह्या जवळपास २९ हजार हेक्‍टरवर ऊस आहे. दुसरीकडे यंदा नव्याने ६६ हजार हेक्‍टरवर उसाचे क्षेत्र विस्तारले आहे. उसाचे क्षेत्र दुपटीने वाढण्यामागे पाण्याची उपलब्धता हे प्रमुख कारण मानले जाते. जवळपास ६६ हजार हेक्‍टरवर विस्तारलेल्या उसाच्या पिकापैकी काही भागात चाबूक काणी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्‍यात हा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसून आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यातील भूसणी येथील महेश सिद्‌धराम स्वामी, महेश सिद्धराम हिरमुखे, सचिन बसान्ना बिराजदार, इराण्णा हावलय्या स्वामी, गुंडेराव पाटील आदींच्या ऊस पिकात तर लोहारा तालुक्‍यातील उदतपूर शिवारातील व्यंकट पाटील व अन्य शेतकऱ्यांकडे ही समस्या आढळली आहे. 

दहा एकर उसापैकी ७ एकर खोडवा व ३ एकर नव्याने लागवड केलेला ऊस आहे. केवळ माझ्याच नव्हे तर गाव शिवारातील अनेकांच्या ऊस पिकात हा प्रादुर्भाव आढळून आला असून तो झपाट्याने पसरतो आहे.  - व्यंकट पाटील,  उदतपूर ता. लोहारा, जि. उस्मानाबाद 

दोन एकर खोडव्याचा ऊस आहे. आधी थोड्या प्रमाणात दिसणारा चाबूक काणी रोग वाढत गेला. इतरही काही शेतकऱ्यांच्या शेतात तो दिसून आला आहे. प्रादुर्भाव जवळपास १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत आहे.  - चिदानंद सुभाष स्वामी,  भूसनी ता. उमरगा, जि. उस्मानाबाद 

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. श्रीकृष्ण झगडे यांचा सल्ला 

  • - प्रादुर्भावग्रस्त शेतातील ऊस बेण्यासाठी वापरू नये 
  • - प्रादुर्भावग्रस्त ऊस छाटणी कात्रीने अलगद छाटून पोत्यामध्ये भरावे. 
  • - छाटतांना उसाचा पोगा फटकारला जावून काजळी अन्य निरोगी उसावर पसरणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • - काणीयुक्‍त छाटलेले पोगे पोत्यासहित जाळून नष्ट करावेत. 
  • - प्रादूर्भावग्रस्त पोग्यासाठी वापरलेली कात्री निरोगी उसासाठी वापरू नये. 
  • - ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्‍के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्‍के एससी या संयुक्‍त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. 
  • - १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त काणीचा प्रादुर्भाव असल्यास उसाचा खोडवा घेऊ नये.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com