पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना मिळाली घरे

पुणे ः राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आवास योजनांद्वारे ९ हजार कुटुंबांचे टुमदार घरांचे स्वप्न साकार झाले आहे.
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना मिळाली घरे
Over 9,000 in Pune district The families got houses

पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आवास योजनांद्वारे ९ हजार कुटुंबांचे टुमदार घरांचे स्वप्न साकार झाले आहे. जिल्ह्यात पंतप्रधान, रमाई, शबरी आदिवासी घरकुल योजनांद्वारे लाभार्थ्यांना कच्च्या घरातून पक्क्या घरांमध्ये हक्काचा निवारा मिळाला आहे’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

प्रसाद म्हणाले,‘‘ जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे प्रत्येक गरजू कुटुंबाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) द्वारे जिल्ह्यात २०१९- २० मध्ये ४ हजार ५ कुटुंबांना, तर २०२०-२१ मध्ये २ हजार ९४१ कुटुंबांना घरांचा लाभ दिला. दुर्गम भागातील घरांची कामेही पूर्ण केली. कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील १ हजार १३४ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी विनामूल्य शासकीय जागा दिली. ’’ 

‘‘‘शबरी’द्वारे जिल्ह्यात २०१९-२० या एकाच वर्षात तब्बल ८६६ घरांची कामे मंजूर करण्यात आली. याद्वारे २५ भूमिहीन लाभार्थ्यांना विनामूल्य शासकीय जागा दिली. जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबाचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तर, रमाई आवास योजनेतून २०१९-२० वर्षात १ हजार ८५२ कुटुंबांना घरकुलांचा लाभ देण्यात आला. याद्वारे भूमिहीन ३३ कुटुंबांना शासकीय जागा दिली,’’ असेही प्रसाद म्हणाले.

‘ई-घरकुल मार्ट’ उपक्रम

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत ग्रामीण भागातील कच्चे घर तसेच बेघर नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार ९ तालुके डोंगरी भागात समाविष्ट आहेत. घरकुल बांधकामाचे साहित्य लाभार्थ्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र बँकेतर्फे ‘ई- घरकुल मार्ट’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com