पुणे जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या आठवड्यात पश्चिमेकडील तालुक्यांतील काही भागात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपवाटिकांची तयारी सुरू केली आहे. जिल्हयात आतापर्यंत ३१४४ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. चालू आठवड्यात चांगला पाऊस झाला तर भात रोपांची लागवड वेळेवर होईल. 

गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात दोन हजार २५ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या होत्या. यंदा पावसाने उशीर केला असला तरी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रोपवाटिका केल्या आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर वेगाने रोपवाटिका टाकण्यास सुरवात केली. त्यामुळे भात रोपवाटिका क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५४ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. भात लागवडीसाठी १५ ते २० दिवस अगोदर रोपवाटिका शेतकरी तयार करतात. सध्या भात रोपवाटिकेची कामे अंतिम टप्यात आहे. अनेक ठिकाणी रोपवाटिकेतील भात रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. येत्या आठ दिवसात चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पुढील आठवड्यात भात रोपवाटिकेतील रोपांच्या पुनर्लागवडी सुरू होतील अशी शक्यता आहे.

तालुकानिहाय भात रोपवाटिका (हेक्टर) 
तालुका रोपवाटिका क्षेत्र 
हवेली   ५५ 
मुळशी  ४५०
भोर   ३००
मावळ ९७६
वेल्हे   ४९०
जुन्नर    ३१०
खेड २०० 
आंबेगाव २९५ 
पुरंदर  ६८
एकूण ३१४४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com