नाशिक जिल्ह्यातील मक्याचे १६ कोटी शेतकऱ्यांना अदा

नाशिक : ‘‘जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रांवर एकूण १ लाख ८९६ क्विंटल खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ९७,२१९ क्विंटल मका खरेदीची नोंदणी पूर्ण झाली.
 Paid to 16 crore maize farmers in Nashik district
Paid to 16 crore maize farmers in Nashik district

नाशिक : ‘‘जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रांवर एकूण १ लाख ८९६ क्विंटल खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ९७,२१९ क्विंटल मका खरेदीची नोंदणी पूर्ण झाली. त्याचे १७ कोटी ११ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यात वर्ग करण्यात आले आहेत’’, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली. 

जिल्ह्यात मे महिन्यात मका खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १५ दिवसानंतर खरेदीपोटी पैसे शेतकऱ्यांच्या वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र असे न होता थेट दोन महिन्यानंतर जुलैअखेर अवघ्या ५,६८१ क्विंटल मका खरेदीच्या पोटी शेतकऱ्यांना १ कोटींचा परतावा मिळाला. मात्र, उर्वरित ९१,५३८ क्विंटल मक्याच्या १६ कोटी ११ लाख रुपयांची शेतकऱ्यांची देयके प्रलंबित होती. ही देयके दोन टप्प्यात आत्तापर्यंत पूर्ण वर्ग करण्यात आली आहेत.

पहिल्या टप्प्यात ५,६८१ क्विंटल मक्याचे प्रतिक्विंटल १,७६० रुपये प्रमाणे १ कोटी रुपये, तर ज्वारी खरेदीत पोर्टलवर नोंद झालेल्या ५१० क्विंटल खरेदीची देयके २,५५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे १३ लाख ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मात्र, ९१,५६८ क्विंटल मका खरेदीपोटी १६ कोटी ११ लाख ६ हजार ८८० रुपये प्रलंबित होते.

शेतकऱ्यांना भांडवलाची अडचण नसल्याने देयकांची मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने पोर्टलवर नोंद झालेली मका व पोर्टलवर नोंद न झालेली मका यांच्या एकूण देयकांपोटी १६ कोटी ८२ लाख ८४ हजार ५८५ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार उशिरा का होईना ही कार्यवाही झाली आहे. प्रस्ताव अर्थ खात्याकडे अडकल्याने देयके वेळेवर अदा झाली नसल्याचे बोलले जात आहे.

खरेदी, देयकांची स्थिती

धान्य एकूण खरेदी  पोर्टलवर नोंदणी अदा रक्कम 
मका  १ लाख ८९६  ९७ हजार २१९ १७ कोटी ११ लाख
ज्वारी  ७८७.५०  २७७.५० १३ लाख ५००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com