पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही दरही 

खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना सुरवातीपासूनच अल्प किंवा कमी मिळत आहेत. दरांचा तिढा वारंवार तयार होत असून, ४.७५ रुपये प्रति किलो दर जागेवरच मिळेल, असा निर्णय नुकताच शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत झाला.
 पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही दरही 
Papilla Milena Kiola 4.75 Rupees Chahi Darhi

जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना सुरवातीपासूनच अल्प किंवा कमी मिळत आहेत. दरांचा तिढा वारंवार तयार होत असून, ४.७५ रुपये प्रति किलो दर जागेवरच मिळेल, असा निर्णय नुकताच शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत झाला.  पण ४.७५ रुपये प्रति किलोचा दरही शेतकऱ्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. दरांबाबत तिढा तयार झाल्यानंतर खरेदीदार लागलीच बैठक घेतात. त्यात सर्व निर्णयांमध्ये आपला होकार असल्याचे सांगतात. पण दर मात्र खरेदीच्या वेळेस ठरल्यानुसार शेतकऱ्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात सर्वाधिक चार हजार हेक्टरवर पपई लागवड शहादा तालुक्यात झाली आहे. या पाठोपाठ जळगावमध्ये लागवड आहे. सुमारे सात हजार हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या भागातही लागवड बऱ्यापैकी आहे. पपई दर ऑक्टोबरमध्ये स्थिर होते. पण नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दरात सतत घट झाली. आता दर पाच रुपये प्रति किलो देखील नाहीत. काही शेतकऱ्यांच्या पपईचे अतिपाऊस व रोगराईमुळे नुकसान झाले होते. त्यांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. काही शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून पीक वाढविले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे दर्जेदार पपई उत्पादन येत आहे. पण दर हवे तसे नसल्याने सतत नुकसान सहन करावे लागत आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या खानदेशात रोज २५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक सुरू आहे. राजस्थान, दिल्ली येथील व्यापारी शहादा, शिंदखेडा आदी भागातील एजंटच्या मदतीने खरेदी करून घेत आहेत.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.