पवना फुल उत्पादक संघाचे दररोज सव्वा लाखांचे नुकसान 

पुणे ः ‘कोरोना’मुळे सर्व देशात लाॅकडाऊन आहे. त्याचा फटका मावळमधील पवनानगर येथील पवना फुल उत्पादक संघाला बसला आहे. संघाला दररोज सुमारे सव्वा लाखाचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे हा संघ अडचणीत आला आहे. शासनाने विक्रीसाठी व निर्यातीसाठी परवानगीद्यावी. अन्यथा संघाला शासनाने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे.
Pavana Flower Producers' Union loss of one and a half lakh per dayPavana Flower Producers' Union loss of one and a half lakh per day
Pavana Flower Producers' Union loss of one and a half lakh per dayPavana Flower Producers' Union loss of one and a half lakh per day

पुणे ः ‘कोरोना’मुळे सर्व देशात लाॅकडाऊन आहे. त्याचा फटका मावळमधील पवनानगर येथील पवना फुल उत्पादक संघाला बसला आहे. संघाला दररोज सुमारे सव्वा लाखाचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे हा संघ अडचणीत आला आहे. शासनाने विक्रीसाठी व निर्यातीसाठी परवानगी द्यावी. अन्यथा संघाला शासनाने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. 

मावळ तालुक्यात एकत्र पद्धतीने फुल शेती करणारा पवना फुल उत्पादक संघ ‘कोरोना’मुळे संकटात आला आहे. पवना फुल उत्पादक संघाचे चालू १५ एकर क्षेत्र असून या पॉलिहाऊसमधून दररोज प्रति एकर २००० फुले उत्पादन होते. तर महिन्याकाठी सुमारे ६० हजार फुलांचे उत्पादन होते. ही फुले देशातील अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोदा, दिल्ली, कानपूर, नागपूर, लखनऊ, अमरावती, इंदौर, पुणे, मुंबई, जम्मू, कोलकत्ता, हैद्राबाद, सिलीवडी या देशातील बाजारात विक्रीसाठी जातात. तर परदेशात जपान, नेदरलॅड या देशात निर्यात होते. सरासरी प्रत्येक फुलास चार रूपये दर मिळत असतो. 

‘कोरोना’मुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने व सध्या देशात लॉकडाऊन सुरू असल्याने दररोज १ लाख २५ हजार रूपयांचे नुकसान पवना फुल उत्पादक संघाचे होत आहे. निर्यात ११ मार्चपासून बंद तर स्थानिक बाजारपेठा १५ मार्च पासून बंद आहे. शासनाच्या आदेशानुसार १४ एप्रिल पर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याने साधारण ४० ते ५० लाखांहून अधिक नुकसान होणार आहे. तर या शेतीवर दररोज एकरी ८ कामगारांचा खर्च चालू आहे. 

सध्या १५ एकरमध्ये सगळे १२५ कामगारांची हजेरी चालू असून यातून दररोज २५ हजार मंजूरी खर्च चालू आहे. परंतु या परिस्थिती पुढे पर्याय नसून संघाचे भवितव्य अंधारमय झाले आहे. जर ‘कोरोना’ संकट थांबले तर स्थिती पूर्ववत होण्यास ७ ते ८ महिने कालावधी लागेल. कारण फुल जीवनानश्यक वस्तू नसून ती शोभेची वस्तू आहे. 

सरकारने कर्ज हप्ते भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावा. बॅंकांना चालू अर्थिक वर्षीचे व्याज सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करावे. यातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. फुल शेतीत काम करणाऱ्या मजुरांना अर्थिक मदत सरकारने करावी. परिस्थिती सुधारली नाही तर फुले शोभेची वस्तू असल्याने पूर्ण व्यवसाय कोलमडेल. या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. तर बाजारपेठ बंद असल्याने खते औषधे उपलब्ध होत नसून यामुळे फुलावर रोगाचे प्रमाण वाढले आहे. 

‘कोरोना’मुळे फुलांची विक्री बंद आहे. यामुळे फुलाचे करायचे काय अशा प्रश्न संघापुढे उपस्थित झाला आहे. आम्ही दररोज फुलांची काढणी करून फेकून देत आहोत. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.  - मुकूंद ठाकर, अध्यक्ष, पवनानगर फुल उत्पादक संघ, पवनानगर   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com