नांदेड परिमंडलात कृषिपंपधारकांकडून दोन कोटींचा वीजबिल भरणा

नांदेड : कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान नुकतेच जाहीर झाले.
 Payment of electricity bill of Rs. 2 crore by agricultural pump holders in Nanded circle
Payment of electricity bill of Rs. 2 crore by agricultural pump holders in Nanded circle

नांदेड : कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान नुकतेच जाहीर झाले. या धोरणानुसार नांदेड परिमंडलातील पाच हजार ५० कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा केला. ते थकबाकी मुक्त झाले.  

महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला.

पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला. त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. 

चार हजार १९८ कोटींची एकूण थकबाकी 

नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख चार हजार ८५१ कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी आहे. चार हजार १९८ कोटी ७६ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण १७०३ कोटी ५९ लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले.

उरलेल्या २४९५ कोटी १७ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे १२४७ कोटी ५८ लाखांची रक्कम माफ करण्यात येईल.

नांदेड परिमंडलातील कृषिपंप ग्राहकांनी महा कृषी ऊर्जा अभियानात वीजबिलांची थकबाकी भरून थकबाकीमुक्तीच्या अभियानात सहभागी व्हावे. - दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंता, महावितरणच्या नांदेड परिमंडळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com