आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी जाहीर करावी

मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६) कोल्हापुरातून सुरू होणाऱ्या मूक आंदोलनस्थळीची पाहणी खासदार संभाजीराजे यांनी केली. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी जाहीर करावी People's representatives regarding reservation Declare your responsibility
आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी जाहीर करावी People's representatives regarding reservation Declare your responsibility

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६) कोल्हापुरातून सुरू होणाऱ्या मूक आंदोलनस्थळीची पाहणी खासदार संभाजीराजे यांनी केली. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीचा आढावा त्यांनी मंगळवारी (ता. १५) घेतला. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी हे आंदोलन होईल. आंदोलन शांततेत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.  संभाजीराजे या आंदोलनाची माहिती देताना म्हणाले, ‘‘सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार आहे. आमदार, खासदार आणि जिल्ह्यातील पालकमंत्री या सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी, अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी. या आंदोलनात कोल्हापूरसह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमोर येऊन सन्मानपूर्वक भूमिका मांडावी.’’ दरम्यान, या आंदोलनात राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली आहे. मराठा आंदोलनात दोन मंत्री सहभागी होणार : अजित पवार पुणे : छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. आमचा आंदोलनाला विरोध नाही, मात्र कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. कोल्हापुरातील मूक आंदोलनामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील, अशी माहितीही या वेळी अजित पवार यांनी दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com