लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक

कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास अटक

नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अरविंद पगारे (रा. जगताप मळा, नाशिक रोड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.  करंजाळी (ता. पेठ) येथील एका कृषी केंद्राचे शेतीपयोगी, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा साठा योग्य असल्याचे दाखविणे, तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येऊ नये म्हणून पगारे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बुधवारी (ता.२४) पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली. १५ नोव्हेंबर रोजी लाच मागितली होती. नाशिक परीक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक अनिल बागूल, जयंत शिरसाठ यांनी बुधवारी (ता. २४) सापळा रचून कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com