संपूर्ण देश पुढील २१ दिवस ‘लॉकडाउन’

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला भारतातून हद्दपार करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ची शिस्त काटेकोरपणे पाळण्याचे हात जोडून आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा पूर्ण लॉकडाउन लागू करण्याची महत्त्वाची घोषणा मंगळवारी (ता.२४)केली.
संपूर्ण देश पुढील २१ दिवस ‘लॉकडाउन’
संपूर्ण देश पुढील २१ दिवस ‘लॉकडाउन’

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला भारतातून हद्दपार करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ची शिस्त काटेकोरपणे पाळण्याचे हात जोडून आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा पूर्ण लॉकडाउन लागू करण्याची महत्त्वाची घोषणा मंगळवारी (ता.२४) केली. घराबाहेर अजिबात पडू नका, असे कळकळीचे आवाहन करताना पंतप्रधानांनी ही एक प्रकारची संचारबंदीच असेल.

पंतप्रधानांनी जाहीर केलेला लॉकडाउन मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल पुढील २१ दिवस कायम असेल. जगात वणव्याप्रमाणे पसरणाऱ्या कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो असे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे आजमध्यरात्रीपासून पुढचे २१ दिवस घरातच हा, घरातच राहा, घरातच राहा, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी, ‘२१ दिवस घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका व निष्काळजीपणा दाखवाल तर त्याची फार मोठी किंमत साऱ्या देशाला चुकवावी लागेल व २१ दिवसांची हानी भरून काढण्यास २१ वर्षेही अपुरी पडतील,’ असा इशाला त्यांनी दिला. एक लाख रूग्णांना ६७ दिवस, त्यापुढील एक लाख लोकांना त्याची लागण होण्यास ११ दिवस व नंतर पुढील एक लाख लोकांना कोरोनाने फक्त एका दिवसा विळखा घातला, असे जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण आहे, असे सांगून मोदी म्हणाले की जेव्हा मानवजातीवरच संकट येते तेव्हा देशवासीयांनी एकजुटीने त्याचा मुकाबला केला आहे. ‘जान है तो जहान है’ असे आवर्जून सांगितले व या २१ दिवसांच्या कोरोना लढाईसाठी देशवासीयांना साद घातली. सारी साधनसंपत्ती असलेले अमेरिका, इटली, जर्मनीसारख्या मोठ्या देशांनाही कोरोनाने कसे पूर्ण हतबल केले याचे उदाहरण मोदींनी दिले. तुम्ही २१ दिवसांची गृहकैद पाळली नाहीत तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतील व देश फार मोठ्या संकटाच्या खाईत लोटला जाईल असेही मोदी म्हणाले. आज जर आम्ही सावध झालो नाही तर काहींचा बेजबाबदारपणा मानवजातीला संकटात टाकेल असेही मोदी म्हणाले. 

आपला संकल्प वारंवार भक्कम करा, वारंवार संयम राखा, लक्षात ठेवा जान है तो जहान है, जोपर्यंत लॉकडाउन आहे तोपर्यंत संकल्प कायम ठेवायचा आहे. घरात राहून आपण अशांचा विचार करा जे आपला जीव धोक्यात घालून महामारीची लागण झालेल्या प्रत्येक जीवाला वाचविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, अशा सर्वांचाच याच समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखायचा आहे. संक्रमण चक्र तोडावे लागेल. काही लोक या गैरसमजात आहेत की, सोशल डिस्टन्सिंग म्हमजे केवळ रुग्णांसाठी आवश्यत आहे, पण हा विचार चुकीचा आहे. सोशल डिस्टन्सिंग प्रकत्येक नागरीकासाठी, प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक घरासाठी, पंतप्रधानांसाठी सुद्धा आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नाही लॉकडाउच्या काळात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू, औषधे व इतर गोष्टी मिळत राहतील. या गोष्टींचा पुरेसा साठा सरकारकडे असून, केंद्र आणि राज्यांची यंत्रणा मिळून लोकांचा त्यांचा तुटवडा भासू देणार नाही, असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. लोकांनी घाबरून जाऊ नये व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा आग्रहही त्यांनी धरला. 

हे सुरूच राहणार

  • रुग्णालये व इतर वैद्यकीय सेवा
  • बँका, विमा कार्यालये, एटीएम
  • मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे
  • दूरसंचार व इंटरनेट सेवा
  • सर्व जीवनावश्यक सेवा
  • पेट्रोल पंप, एलपीजी सिलिंडल सेवा
  • पोलिस, होमगार्ड, अग्निशामन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन,
  • जिल्हा प्रशासन
  • वीज, पाणी आणि मलनिःसारण विभाग
  • सर्व सरकारी कार्यालयात आवश्यक तेवढीच उपस्थिती असेल
  • - हे बंद राहणार

  • सर्व कारखाने, खासगी आस्थापना
  • रेल्वे, हवाई व रस्ते वाहतूक
  • सर्व शैक्षणिक संस्था
  • सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद
  • सर्व सभा-समारंभ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com