राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस पदके 

केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जाहीर केलेल्या पोलिस पदकांमध्ये राज्यातील ५१ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस पदके 
Police medals for 51 officers and employees in the state

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जाहीर केलेल्या पोलिस पदकांमध्ये राज्यातील ५१ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, सात पोलिसांना शौर्य पदक तर ४० प्रशंसनीय सेवा पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ९३९ पोलिस पदके जाहीर केली असून, यात ८८ पोलिसांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, १८९ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदके आणि दोन राष्ट्रपती शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील ५१ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून, देशातील ८८ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदके जाहीर झाली आहेत. 

राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक  विनय कोरगावकर, (अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई), प्रल्हाद खाडे, (कमांडंट एसआरपीएफ, गट ६, धुळे), चंद्रकांत गुंडगे, पोलिस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे), अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, (पोलिस उपनिरीक्षक एस. पी, नांदेड ) 

पोलिस शौर्य पदक  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोपाळ उसेंडी  पोलिस नाईक महेंद्र गानु कुलेटी  पोलिस हवालदार संजय बकमवार  पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे  पोलिस नाईक दिवाकर नारोटे  पोलिस नाईक निलेश्वर पड  पोलिस हवालदार संतोष पोटवी 

अग्निशमन दलाचाही सन्मान  अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण ४२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अग्निशम सेवा पदके जाहीर केली. यात सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये बाळू देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक तर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.   

पोलिस पदक  राजेश प्रधान, विशेष पोलिस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा,मुंबई  चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त सीपी मीरा भाईंदर, वसई विरार  सीताराम जाधव, पोलिस उपअधीक्षक (वायरलेस), पुणे  भारत हुंबे, पोलिस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी  गजानन भातलवंडे, निरीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर  अजयकुमार लांडगे, पोलिस निरीक्षक,नवी मुंबई  जितेंद्र मिसाळ, पोलिस निरीक्षक मुंबई  विद्याशंकर मिश्रा, पोलिस निरीक्षक नागपूर  जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक,नवी मुंबई  सुरेंद्र मलाले, पोलिस निरीक्षक,औरंगाबाद शहर  प्रमोद लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट ४,नागपूर  मिलिंद नागावकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी, मुंबई  शशिकांत जगदाळे, पोलिस निरीक्षक, मुंबई शहर  रघुनाथ निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई शहर  संजय कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक,नाशिक शहर  राष्ट्रपाल सवाईतुल, पोलिस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर  प्रकाश चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, पुणे शहर  नंदकिशोर सरफरे, पोलिस उपनिरीक्षक,मुंबई  राजेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक, परभणी  वाजी देसाई, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई  राजाराम भोई, पोलिस उपनिरीक्षक, जळगाव  देवेंद्र बागी, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई  संभाजी बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सातारा  बबन शिंदे, चालक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, कोल्हापूर  पांडुरंग वांजळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक,पुणे शहर  विजय भोग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पुणे शहर  पांडुरंग निघोट, सहायक पोलिस उपनिरीक्षक,नवी मुंबई  राजेंद्र चव्हाण सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई शहर  अनिल भुरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक,भंडारा  संजय तिजोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अहमदनगर  रविकांत बडकी, सहायक उपनिरीक्षक,यवतमाळ  अल्ताफ शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अहमदनगर  सत्यनारायण नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई शहर  बस्तर मडावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, गडचिरोली  काशिनाथ उभे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पुणे  अमरसिंग भोसले, सहायक पोलिस उपनिरीक्षक,एसीबी, कोल्हापूर  आनंदराव कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सांगली  मधुकर पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई शहर  सुरेश वानखेडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नागपूर शहर  लहू राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई शहर 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com