बेदाणा, गूळनिर्यात धोरण लवकरच

कृषी उत्पादनांच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण आखले जात आहे.
raisin and jagery
raisin and jagery

पुणे ः कृषी उत्पादनांच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण आखले जात आहे. यामध्ये विविध २१ पिकांसाठी क्लस्टरनिर्मिती केली असून, यामधील गूळ आणि बेदाणा निर्यात धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. यासाठीच्या तज्ज्ञांसह संबंधित घटकांच्या बैठका नुकत्यात झाल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शेतीमालाचे प्रक्रिया आणि मूल्यवर्धन बांधावरच करण्याचे प्रयत्न निर्यात धोरणाच्या आखणीमध्ये केले जात आहे. हे धोरण आखताना पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई, पणन सचिव अनुपकुमार यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गूळ आणि बेदाणा निर्यात धोरणासाठीची बैठक झाली. बैठकीमध्ये बेदाणा व गुळाच्या निर्यात संधी व वाव, सोई-सुविधा व आवश्यक असलेल्या उपाययोजना, अपेडा व कृषी पणन मंडळाच्या अर्थसाह्य योजना, बेदाणा व गूळ संदर्भात हाताळणी, वाहतुकीबाबत समस्या व उपाययोजना याबाबत चर्चा करून ब्रॅण्डिंग, निर्यात वृद्धीकरिता बाजार विकासासाठी उपाययोजना निर्यात वृद्धीकरिता नावीन्यपूर्ण बाबी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच  सांगलीच्या बेदाण्याला व कोल्हापूरच्या गुळास भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे, निर्यातीमध्ये भौगोलिक मानांकनाचे महत्त्व व ब्रॅण्डिंगकरिता त्याचा वापर कसा वापर करता येऊ शकेल यावर चर्चा झाली. भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनाकरिता पणन मंडळाच्या अर्थसाह्य योजनेचा फायदा संबंधित उत्पादक व संस्थेने करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले.’’

प्रतिक्रिया राज्यातील कृषी उत्पादनांचा आवाका विचार घेता राज्याच्या कृषी निर्यात धोरणामध्ये राज्यातील प्रमुख पिके आणि उत्पानांच्या २१ क्लस्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामधील बेदाणा आणि गुळाच्या क्लस्टरबाबतची बैठका नुकत्याच घेण्यात आल्या.  - सुनील पवार , कार्यकारी संचालक, राज्य कृषी मंडळ, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com