अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय घमासान

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती सम्राट डोंगरदिवे व स्फूर्ती गावंडे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे मिळून २४ सदस्यांनी सर्वसाधारण व स्थायी समितीची सभा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. मात्र अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय घमासान
Political turmoil in Akola Zilla Parishad even in New Year

अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण नववर्षातही सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती सम्राट डोंगरदिवे व स्फूर्ती गावंडे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष असे मिळून २४ सदस्यांनी सर्वसाधारण व स्थायी समितीची सभा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. मात्र अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. आता हे प्रकरण कुठले वळण घेते याची चर्चा सुरू आहे.

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण व स्थायी समितीची सभा घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु स्थायीची सभा नुकतीच पार पडली असून, सभापती निवडीचा विषय विभागीय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत सभा घेण्याची मागणी अध्यक्षा भोजने यांनी फेटाळून लावली. मागणी फेटाळणे हे संबंधितांसाठी चपराक म्हटली जात आहे. याविषयी आता विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्याची दाट शक्यता आहे. 

जिल्हा परिषदेच्या दोन सभापतिपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव करीत विरोधकांनी बाजी मारली होती. महिला व बाल कल्याण सभापतीच्या निवडणुकीत स्फूर्ती गावंडे तर विषय समिती सभापतिपदावर सम्राट डोंगरदिवे यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान निवडणूक प्रक्रियेसाठी पार पडलेल्या विशेष सभेला वंचित समर्थित अपक्ष सदस्या नीता गवई यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले आहे. याप्रकरणी आता विभागीय आयुक्त निकाल देणार आहेत. 

सदर विषयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदस्यांनी केलेली विशेष सर्वसाधारण आणि स्थायी समितीची सभा घेण्याची मागणी अध्यक्षांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीविरुद्ध इतर असे चित्र तयार होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.