यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी वाढण्याची शक्यता 

राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी अभियान राबविले आहे. त्यामुळे यंदा राज्यासह देशातून डाळिंबाची निर्यात करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.
 यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी वाढण्याची शक्यता 
Pomegranate exporter this year Farmers are likely to grow

सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी अभियान राबविले आहे. त्यामुळे यंदा राज्यासह देशातून डाळिंबाची निर्यात करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. आतापर्यंत देशातून २ हजार ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली.  देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून डाळिंब युरोपसह अन्य देशांत डाळिंबाची निर्यात केली जाते. गतवर्षी देशातून २४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. डाळिंब पिकावर गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचे संकट असले, तरी काटेकोर नियोजन करत शेतकरी डाळिंबाच्या बागा साधत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत देशातून डाळिंब निर्यात करण्यासाठी २ हजार ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात ३ हजारांहून अधिक डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी होण्याची शक्यता आहे.  राज्यातून डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मात्र गतवर्षी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले असल्याने सुमारे ९०० ते १००० शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी केली होती. परंतु डाळिंब निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असली तरी, पावसामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला होता. परिणामी, राज्यातून डाळिंबाच्‍या निर्यातीला फटका बसला होता. मात्र यंदाच्या हंगामात देखील पावसाचा फटका पिकाला बसला असला, तरी डाळिंब निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक नोंदणी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामात राज्यातून ९२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

इतर राज्यांतून नोंदणीला प्रतिसाद कमी  वास्तविक पाहता, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि गुजरात या तिन्हीही राज्यातून डाळिंबाची निर्यात फारशी होत नाही. मात्र या राज्यातील शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. डाळिंबाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली असली तरी, नोंदणीला फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसते आहे. येत्या काळात या राज्यातूनही निर्यातीसाठी शेतकरी पुढे येण्‍याची शक्यता आहे.   

राज्यनिहाय डाळिंब निर्यातीसाठी झालेली शेतकऱ्यांची नोंदणी  राज्य.....नूतनीकरण....नवीन  महाराष्ट्र....६६१....२६३  आंध्र प्रदेश...०००...११२८  कर्नाटक...०००...३५९  गुजरात...२१...०००  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com