पूर्वमोसमी पावसाची शक्यता 

‘यास’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील काही भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विदर्भात उन्हाचा चटका काहीसा वाढल्याने कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : ‘यास’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील काही भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. विदर्भात उन्हाचा चटका काहीसा वाढल्याने कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांत पूर्वमोसमीच्या जोरदार सरी पडतील. शुक्रवारी (ता. २८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मालदिवपर्यंत दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू आहे. त्यापूर्वी राज्यातील वातावरणात चढउतार होत आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळपासून उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. मराठवाडा विदर्भात कमाल तापमानाचा पारा काहीसा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पारा चाळिशीच्या खाली असला तरी उन्हाचा चटका अजूनही कायम आहे. जळगाव, नगर, पुणे, नाशिक, कोकण अशा तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होऊ लागला आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  शनिवार ः संपूर्ण महाराष्ट्र  रविवार ः संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र  सोमवार ः संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र  मंगळवार ः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा  शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३३.८ 
  • अलिबाग ३४.६ 
  • रत्नागिरी ३३.६ 
  • डहाणू ३३.२ 
  • पुणे ३३.७ 
  • जळगाव ३९.८ 
  • कोल्हापूर ३१.८ 
  • महाबळेश्‍वर २५.१ 
  • मालेगाव ४०.६ 
  • नाशिक ३३.३ 
  • सांगली ३३.६ 
  • सातारा ३२.५ 
  • सोलापूर ३७.४ 
  • औरंगाबाद ३७.४ 
  • परभणी ३९.१ 
  • बीड ३९ 
  • अकोला ४०.७ 
  • अमरावती ४०.४ 
  • बुलडाणा ३७.८ 
  • ब्रह्मपुरी ४३.१ 
  • चंद्रपूर ४३ 
  • गोंदिया ४२.२ 
  • नागपूर ४२.५ 
  • वर्धा ४३ 
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com