तूरदरात तेजीची शक्यता

वातावरणातील बदलाच्या परिणामी तुरीची उत्पादकता यावर्षी प्रभावित होण्याची शक्यता असल्याने येत्या काळात तुरीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता बाजार सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
तूरदरात तेजीची शक्यता
Likely to accelerate

नागपूर : वातावरणातील बदलाच्या परिणामी तुरीची उत्पादकता यावर्षी प्रभावित होण्याची शक्यता असल्याने  येत्या काळात तुरीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता बाजार सूत्रांकडून वर्तविली जात आहे. तुरीचा हमीभाव ६३०० रुपये असून त्यापेक्षा अधिक दराने तुरीची व्यवहार होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

देशांतर्गत तुरीखालील सरासरी क्षेत्र ४४.२९ लाख हेक्टर आहे. त्यामध्ये सर्वाधिक १२.७७ लाख हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात असून, त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये ९.९३ लाख, मध्य प्रदेश ५.३०, गुजरात २.६३, उत्तर प्रदेश २.८५, झारखंड २.११, तेलंगणा २.९६, ओडिसा १.३९, आंध्र प्रदेश २.५०, तमिळनाडू ०.५६ लाख हेक्टर याप्रमाणे समावेश आहे. २०२१-२१ या वर्षात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा १२.६४ अशा कमी क्षेत्रावर तुरीची लागवड झाली. गुजरातमध्ये तूर लागवड क्षेत्र वाढले असे शासकीय आकडेवारी सांगते. गुजरातमधील लागवड ३.४५ लाख हेक्टर होती. हंगामाच्या अखेरीस सर्वदूर धुके पसरले होते. त्यामुळे तुरीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. ढगाळ वातावरणामुळे देखील तुरीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता प्रभावित झाली. या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात सुधारणांची शक्यता वर्तवली जात आहे. सहा हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिकचा दर यंदाच्या हंगामात मिळतील, अशी अपेक्षा व्यापारी वर्तवित आहेत. 

अकोला बाजार समितीमधील तूर खरेदीदार व्यापारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरीमध्ये सरासरी दहा टक्के ओलावा अपेक्षित धरला जातो. त्यापेक्षा अधिक आद्रता किंवा ओलावा असल्यास त्यानुसार दर मिळतात. कडक ऊन तापत नाही आणि ढगाळ वातावरण कायम आहे. त्यासोबतच हवेतही गारठा आहे. परिणामी, नव्याने काढणी झालेली तूर शेतकऱ्यांना वाळत घालता आली नाही. व्यापाऱ्यांना देखील ते शक्य होत नसल्याची स्थिती आहे. सद्यःस्थितीत अकोला बाजारात तुरीचे व्यवहार ५६०० ते  ६३१५ याप्रमाणे होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अकोला बाजार समितीत तुरीत सांगली तेजी होण्यात आली होती. ६९०० रुपयांचा दर तुरीला मिळाला होता. सध्या तुरीमध्ये पंधरा टक्के पेक्षा अधिक आद्रता येत असल्याने तुरीचे दर कमी असल्याचे सांगितले जाते. कमी ओलावा असलेली दूर बाजारात येण्यास सुरुवात झाली त्यानंतर बाजारदेखील तेजीत राहतील, असेही व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, खामगाव, लातूर, सोलापूर या बाजार समित्यांमध्ये तुरीची हंगामात सर्वाधिक उलाढाल राहते. मार्च महिन्यापर्यंत बाजारात तूर आवक मोठ्या प्रमाणावर होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.