महाविकास आघाडीची सत्ता  येताच धान खरेदी थांबली 

राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली अन् धान खरेदी थांबली, असा आरोप माजी सामाजिक न्यायमंत्री व भाजप नेते राजकुमार बडोले यांनी केला. गोंदिया जिल्हा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
महाविकास आघाडीची सत्ता  येताच धान खरेदी थांबली  Power of Mahavikas Aghadi As soon as he arrived, he stopped buying paddy
महाविकास आघाडीची सत्ता  येताच धान खरेदी थांबली  Power of Mahavikas Aghadi As soon as he arrived, he stopped buying paddy

भंडारा : राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आली अन् धान खरेदी थांबली, असा आरोप माजी सामाजिक न्यायमंत्री व भाजप नेते राजकुमार बडोले यांनी केला. गोंदिया जिल्हा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.  या वर्षी खरेदी करण्यात आलेल्या खरीप हंगामाचा धान आधारभूत धान खरेदी केंदावर धुळखात पडून आहे. रब्बी हंगामाच्या धानाची खरेदी प्रक्रिया थांबली असल्याने अद्याप एक क्विंटलही धानाची खरेदी झालेली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर पायपीट सुरू आहे. त्यामुळे तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी गोंदियात जिल्हा भाजपच्या तीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह आजी-माजी आमदार आंदोलनात सहभागी झाले होता. येत्या दहा जूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील धान खरेदी केंद्रांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. या आंदोलनाची दखल घेऊन भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आमदार परिणय फुके म्हणाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com