कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा आंदोलन

कृषिपंपाचे रात्रीचे १० तास वीजपुरठ्यामधील दोन तास कमी केलेत ते वाढवावेत. कृषिपंपाचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकीसाठी तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इरिगेशन फेडरेशनने दिला आहे.
Power supply to agricultural pumps should not be cut off, otherwise agitation
Power supply to agricultural pumps should not be cut off, otherwise agitation

कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास वीजपुरठ्यामधील दोन तास कमी केलेत ते वाढवावेत. कृषिपंपाचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकीसाठी तोडू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इरिगेशन फेडरेशनने दिला आहे. 

सलग आलेल्या संकटामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. महावितरण कंपनीने सहकारी पाणीपुरवठा संस्था व कृषिपंपधारक शेतकरी यांची वीजबिलाची थकबाकी भरण्यासाठी अडवणूक करू नये. वीजबिल भरण्यासाठी काही अवधी द्यावा. वीज बिलातील काही रक्कम ते भरत असतील तर ती भरून उर्वरित रकमेसाठी त्यांना हप्ते करून द्यावेत, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणी पुरवठा व वैयक्तिक कृषिपंपांना गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रोटेशन पद्धतीने फीडरवाइज भारनियमन चालू आहे. जिल्ह्यातील बऱ्याच फीडरवरील कृषिपंपांना ३ दिवस दिवसा व ४ दिवस रात्री याप्रमाणे कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरू आहे. पण काही ठिकाणी ४ दिवस दिवसा व ३ दिवस रात्री याप्रमाणे वीजपुरवठा सुरू आहे. पण गेली चार पाच वर्षे झाली सदर रोटेशनचा फटका ज्यांना ३ दिवस दिवसा व ४ चार दिवस रात्री याप्रमाणे वीजपुरवठा सुरू आहे. अशा कृषिपंप ग्राहकांना बसत आहे. 

वरील बाबतीत महावितरण कंपनीने सकारात्मक निर्णय घ्यावेत. अन्यथा, या विरोधी आम्ही तीव्र लढा उभा करू याची नोंद घ्यावी, असा इशारा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना देण्यात आला. या वेळी शिष्टमंडळात वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किणीकर, सुभाष शहापूरे, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, सखाराम पाटील, एस. ए. कुलकर्णी, दत्तात्रय उगले, आर. के. पाटील, रणजीत जाधव, ज्ञानदेव पाटील, सखाराम पाटील, सखाराम चव्हाण, भारत पाटील-भुयेकर, जावेद मोमीन, महादेव सुतार व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com