वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात धरणे 

पुणेजिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार कृषीपंपाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला आहे. याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर वीज वितरण कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.
Power supply smooth To bear in Indapur
Power supply smooth To bear in Indapur

पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार कृषीपंपाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला आहे. याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर वीज वितरण कार्यालयावर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने गेल्या ११ दिवसांपासून पूर्णपणे खंडित केला असल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनी विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महावितरण कंपनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करत असून कृषिपंपाची वीज देखील खंडीत केली आहे. हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिली,  दरम्यान, धरणे आंदोलना दरम्यान शनिवारी (ता.२७) रात्री पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसोबत जेवण केले. आजच्या रविवार (ता.२८) दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच होते. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.  बारामती परिमंडलातील ६ हजार रोहित्रे बंद  बारामती परिमंडलातील सहा तालुक्यांमधील ६६ हजार कृषिपंपाची वीज बंद करण्यात आली असून, सुमारे ६ हजार रोहित्रे बंद असल्याचे वीज वितरण कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या पंपाची सुमारे दीड हजार कोटींची थकबाकी असून, ५० टक्के सवलती योजनेतील ही रक्कम ७५७ कोटी एवढी आहे. सहा तालुक्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौड, शिरुर, भोर, पुरंदरचा समावेश आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com