धानाला यंदाही अडीच हजारांचा भाव : पटेल

भंडारा : पूर्व विदर्भातील धान पट्ट्यात समृद्धीसाठी धानाला योग्य भाव मिळण्याची गरज आहे. त्याकरता येत्या हंगामात उत्पादित धानाला अडीच हजार रुपये भाव दिला जाईल, अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
The price of grain is still Rs 2500 : Patel
The price of grain is still Rs 2500 : Patel

भंडारा  : पूर्व विदर्भातील धान पट्ट्यात समृद्धीसाठी धानाला योग्य भाव मिळण्याची गरज आहे. त्याकरता येत्या हंगामात उत्पादित धानाला अडीच हजार रुपये भाव दिला जाईल, अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

साकोली येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, मदन रामटेके, रामकृष्ण वाडीभस्मे, प्रभाकर सपाटे  उपस्थित होते. 

पटेल म्हणाले,  ‘‘शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा याकरिता शासनाने हमीभावा सोबतच पाचशे रुपये बोनस आणि दोनशे रुपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे सातशे रुपये वाढीव दिले. या माध्यमातून धानाचे दर २५०० रुपये क्विंटलवर पोहोचले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत येत्या हंगामात देखील धानाला अडीच हजार रुपयांचा दर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.’’

शेतकऱ्यांनी देखील धान या एकाच पीकाकडे लक्ष देण्यापेक्षा भाजीपाला मका यासारख्या व्यवसायिक पिकाच्या उत्पादनाकडे लक्ष देण्याची गरज खासदार पटेल यांनी व्यक्त केली. साकोली बाजार समितीचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून खोळंबला आहे.  यामुळे साकोली लाखणी या दोन बाजार समित्यांचे लवकरच विभाजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com