माळेगावच्या प्रदर्शनामध्ये कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा गौरव

माळेगावच्या प्रदर्शनामध्ये कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा गौरव
माळेगावच्या प्रदर्शनामध्ये कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा गौरव

माळाकोळी, जि. नांदेड ः श्री क्षेत्र माळेगाव यामध्ये जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कृषी प्रदर्शन उद्‍घाटन आणि कृषिनिष्ठ शेतकरी सत्कार कार्यक्रमाचे शुक्रवारी (ता. ४) आयोजन करण्यात आले होते.

खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार माधवराव जवळगावकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय रेड्डी, जिल्हा महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, माजी जिल्हा कृषी विकास अधिकारी पंडित मोरे, वनामकृविचे शास्त्रज्ञ डाॅ. शिवाजी तेलंग, देविकांत देशमुख, तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे, श्री. घुमनवाड आदी उपस्थित होते.   

उत्‍कृष्‍ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा दरवर्षी कृषिनिष्ठ पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात येतो. माळेगाव येथे कृषी प्रर्शनामध्ये खासदार अशोक चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार देऊन सपत्‍नीक गौरव करण्‍यात आला.

पुरस्‍कार प्राप्त शेतकरी ः प्रतीक शिंदे (कासारखेड, ता. नांदेड), संभाजी खंडागळे (बारसगाव, ता. अर्धापूर), विजय शिंदे (पांगरी, ता. धर्माबाद), बाळासाहेब देशमुख (उमरा, ता. माहूर), बाबू शिळेकर (बेळकोणी, ता. बिलोली), दिगंबर सोनवळे (देऊळगाव, ता. लोहा), श्रीराम लोखंडे (टींगणवाडी, ता. किनवट), ग्‍यानोबा पुयड (शिंदी, ता. उमरी), गोविंद कमठे (भोसी, ता. भोकर), काशिराम गायकवाड (कळका, ता. कंधार), प्रकाश हामंद (डोणगाव, ता. मुदखेड), बळवंतराव पऊळ (बनचिंचोली, ता. हदगाव), बालाजी माने (पोटा बु., ता. हिमायतनगर), तानाजी पाटील (सकनूर, ता. मुखेड), सुरेश जाधव (फाळी, ता. देगलूर), गोविंद ताटे (मांडणी, ता. नायगाव), अरविंद कदम (वायफणी, ता. माहूर) या शेतकऱ्यांना कृषीनिष्‍ठ पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

अॅग्रोवन दिवाळी अंक व दिनदर्शिका भेट खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्ह्यातील कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा गौरव शाल, श्रीफळ तसेच ‘अॅग्रोवन’चा दिवाळी अंक व दिनदर्शिका भेट देऊन करण्यात आला. एकमेव कृषी दैनिक असलेल्या अॅग्रोवन दिवाळी अंकाची भेट शेतकऱ्यांना देण्यात आली. या वेळी मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त या दिवाळी अंकाचीच चर्चा कार्यक्रम परिसरात होत होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com