पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत पुणे जिल्हा प्रथम 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता पुणे जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज, बुधवारी (ता. २४) नवी दिल्लीपुरस्कार वितरण होणार आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी  योजनेत पुणे जिल्हा प्रथम Prime Minister's Farmers Honors Fund Pune district first in the scheme
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी  योजनेत पुणे जिल्हा प्रथम Prime Minister's Farmers Honors Fund Pune district first in the scheme

पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता पुणे जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आज, बुधवारी (ता. २४) नवी दिल्ली येथे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे पुरस्कार स्वीकारणार आहेत. 

पुणे जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर ५ लाख ३० हजार २३५ शेतकऱ्यांनी नोंदणी झाली आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत ५०० कोटी ५४ लाख १४ हजार एवढा निधी पोर्टल द्वारे जमा करण्यात आलेला आहे. भौतिक तपासणीसाठी २०,०१३ एवढ्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्याचे कामकाज शंभर टक्के पूर्ण करण्यात आले आहे.

योजनेतील १ लाख ७९ हजार एवढ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँकेचा चुकीचा तपशील ४८,२९५ इतका दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच तक्रार निवारणासाठी १,२३५ एवढ्या तक्रारी प्राप्त होत्या त्याचे पूर्ण निराकरण करण्यात आले आहे. आयकर भरणारे व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून ५ कोटी ८० लाख ५8 हजार रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. 

कोरोनाच्या आपत्तीमध्येही तालुका स्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातील या योजनेचे कामकाज पाहणारे पथक, राष्ट्रीय सूचना केंद्रातील वैज्ञानिक, सर्व तहसीलदार व त्यांचे पथक तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मार्गदर्शनामुळे सर्व पथकांनी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील योजनेवर दृष्टीक्षेप 

  • योजनेसाठी पोर्टलवर ५ लाख ३० हजार २३५ शेतकऱ्यांची नोंदणी 
  • लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५०० कोटी ५४ लाख १४ हजार निधी जमा 
  • भौतिक तपासणीसाठी २०,०१३ लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त 
  • योजनेतील १ लाख ७९ हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण 
  • ४८,२९५ लाभार्थ्यांच्या बँकेच्या चुकीच्या तपशिलात दुरुस्ती 
  • अपात्र लाभार्थ्यांकडून ५ कोटी ८० लाख ५8 हजार रुपयांची वसुली   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com