वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य ः देसाई

मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनक्षमता वाढावी यासाठी काम करण्यात येत आहे.
 वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य ः देसाई
Priority to create irrigation system in Washim district

वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी, तसेच मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनक्षमता वाढावी यासाठी काम करण्यात येत आहे. जवळपास ६० ठिकाणी असलेल्या छोट्या जलसंधारण प्रकल्पाची दुरुस्ती करून ती पूर्ववत करून जलसाठा वाढवून त्या परिसरातील शेतीला आठमाही सिंचन व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. शंभूराज देसाई यांनी सांगितले.  प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्‍य शासकीय ध्‍वजवंदन पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. ध्वजवंदनानंतर संबोधित करताना श्री. देसाई बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.  श्री. देसाई पुढे म्हणाले, ‘मातोश्री ग्रामीण पांदण रस्ते योजनेतून जिल्ह्याला जास्त निधी देण्यात येईल. अनेक विकासाच्या योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आकांक्षित जिल्ह्यातून वाशीमला बाहेर काढून राज्यातील इतर विकसनशील जिल्ह्यासारखे काम जिल्ह्यात करण्यात येईल.’  या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भारत-पाक युद्धात हुतात्मा झालेले शिपाई यशवंत सरकटे यांच्या वीरपत्नी शांताबाई सरकटे आणि जम्मू काश्मीर येथे वीरमरण आलेले लान्सनायक दगडू लहाने यांच्या वीरपत्नी पार्वताबाई लहाने यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छता रथाला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.