खारपाण पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर 

अकोला ः उन्हाची तीव्रता वाढली असून खारपाणपट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. खारपाण पट्ट्यातील गावांना खांबोरा पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. सध्या सात ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही अडचण बघता या योजनेतून गावकऱ्यांना चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात विचार केला जात आहे.
The problem of drinking water in the saline belt is serious

खारपाण पट्ट्यात येणाऱ्या आपातापा परिसरातील घुसर, आपातापा, आखातवाडा, अनकवाडी, सुलतान, अजमपूर, गोनापूर, दापुरा, मजलापूर, अंबिकापूर, कौलखेड गोमासे, आपोती बुद्रुक, आपोती खुर्द, मारोडी, लाखोंडा, घुसरवाडी, म्हातोडी या भागातील गावांमध्ये पाणीपुरवठा कधी सात तर कधी दहा ते बारा दिवसांनी होत आहे. आधीच खारपाणपट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यात उन्हाळ्यात दहा-बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या प्रश्‍न अधिकच गंभीर झाला आहे. 

खांबोरा योजनेवरून चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करणे शक्य आहे का? खांबोरा योजनेला उन्नई बंधाऱ्यातील पाणी देण्यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीला बाळासाहेब आपोतीकर, पाणीपुरवठा विभागाचे अनिल चव्हाण, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल गावंडे, जिल्हा परिषद सदस्य पवन बुटे तसेच पाणीपुरवठा विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उन्नई बंधाऱ्यावरील विद्युत समस्या व जलवाहिनीच्या गळतीसंदर्भातही चर्चा करण्यात आली.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com