बीजोत्पादनासाठी खरीप पिकांची क्षेत्र नोंदणी सुरू

बीजोत्पादनासाठी खरीप पिकांची क्षेत्र नोंदणी सुरू
बीजोत्पादनासाठी खरीप पिकांची क्षेत्र नोंदणी सुरू

नांदेड ः खरीप हंगाम २०१९-२० मध्ये विविध पिकांच्या बीजोत्पादनासाठी नांदेड जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयात बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे क्षेत्र नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  

बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या बीजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. मूग व उडीद - २५ जुलै, संकरीत कापूस, सुधारित कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मक्का व तूर - ३१ जूलै २०१९ असून या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा आहेत. क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांत करता येईल त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. 

क्षेत्र नोंदणीकरिता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी यांच्यासह करण्यात येणार ५०० रुपयांच्या बंधपत्रावरील करारनामा, स्रोत बियाणे खरेदी बिल, स्रोत बियाण्यांचे मूळ मुक्तता अहवाल, स्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याचा स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहीत नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसुली दस्तावेज (७/१२ व ८ अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्रोत बियाणेवाटप अहवाल, गाव, पीक व दर्जानिहाय बीजोत्पादकांच्या विहीत प्रपत्रातील याद्या ४ प्रतींत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सादर करावेत. जेणेकरून त्यांना देय असलेल्या अनुदानाबाबत कृषी विभागास कार्यवाही करणे सोईस्कर होणार आहे. अर्जाचे शुल्क १० रुपये प्रति बीजोत्पादक व क्षेत्र नोंदणी शुल्क ५० रुपये प्रतिबीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनाकरिता २०० रुपये प्रति एकर व प्रमाणित बीजोत्पादनासाठी १५० रुपये प्रतिएकर याप्रमाणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com