प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट अधिक भाव ः गोडसे

गेल्या तीन वर्षांत अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मूल्यांकन करून सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
Project victims will not be left to fend for themselves: Godse
Project victims will not be left to fend for themselves: Godse

नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या निर्मितीत नाशिक तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासन कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. शासन आणि मी स्वत:शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करणार आहे. गेल्या तीन वर्षांत अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मूल्यांकन करून सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सिन्नर येथे शनिवारी (ता. १२) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोडे, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, उदय सांगळे, संजय सांगळे, दीपक बरके, संग्राम कातकाडे, विजय कातकाडे, संजय सानप आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या 

 • रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुंटुबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी द्यावी
 • प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड असावेत
 • बाधित क्षेत्राचा सातबाऱ्यावर सद्यःस्थितीतील असलेल्या झाडांच्या नोंदी असो वा नसोत तरी झाडांची भरपाई ग्राह्य धरावी.
 • बाधित शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना नाशिक - पुणे रेल्वे गाडीत मोफत प्रवास सुविधा मिळावी
 • ‘समृद्धी’च्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, गरजेपेक्षा जास्त क्षेत्र संपादित करून नये. औद्योगिक क्षेत्रातील कंपनी बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com