‘स्‍मार्ट’मध्ये प्रस्तावासाठी १४३२ शेतकरी कंपन्या पात्र

कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) योजनेसाठी प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील आतापर्यंत १४३२ शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र झाल्या आहेत.
For proposal in ‘Smart’ Eligible 1432 farmer companies
For proposal in ‘Smart’ Eligible 1432 farmer companies

नगर : कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) योजनेसाठी प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील आतापर्यंत १४३२ शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र झाल्या आहेत. काही कंपन्यांनी प्रकल्प अहवालही सादर केले आहेत. स्मार्टमधील सहभागासाठी राज्यात ४ हजार ४२९ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. त्यात नाशिक, सातारा, अमरावती, बुलडाणा, लातूर, नगर जिल्ह्यांतील कंपन्यांच्या प्रामुख्याने समावेश आहे.

शेतीवरील आधारित मूल्य साखळी विकसित करण्यासाठी शासनाने यंदापासून ‘बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प’ (स्मार्ट) योजना आणली आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक शेती पूरक व्यवसायासाठी योजना राबवली जाणार आहे. ‘उत्पादक भागीदारी आणि उत्पादक भागीदारी करार व बाजार संपर्क वाढ’ अशा दोन प्रकारांत ही योजना आहे.  पान ४ वर 

शेतकरी कंपनीत किमान अडीचशे सभासद असावेत अशी अट आहे. योजनेतून प्रकल्पासाठी साधारण दहा कोटी रुपयांपर्यंत कंपनीला निधी दिला जाईल. त्यात ६० टक्के अनुदान असेल. ‘स्मार्ट’मध्ये जास्तीत जास्त शेतकरी कंपनी सहभागी व्हावे यासाठी ‘आत्मा’च्या अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर कार्यशाळा घेऊन लोकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार राज्यात ४ हजार ४२९ कंपन्यांनी सहभाग घेतला. सहभागी कंपन्यातील सभासद संख्या, नोंदणी, लेखापरीक्षण, आदी महत्त्वाच्या बाबीची तपासणी करून राज्यात आतापर्यंत १४३२ कंपन्याला प्रकल्प अहवाल प्रस्ताव सादर करण्याला परवानगी दिली आहे. काही कंपन्यांनी प्रस्तावही सादर केले आहेत.

पशुसंवर्धन, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण विकास यंत्रणा (उपजीविका अभियान) योजनेतून शेतकरी कंपनीला प्रकल्पासाठी लाभ मिळणार आहे. मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या कंपन्यांच्या त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. दाखल प्रकल्प प्रस्तावाचा विचार करता पूरक उद्योग तसेच प्रक्रियाला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हानिहाय मान्यता मिळालेल्या शेतकरी कंपन्या (कंसात एकूण अर्ज)  ठाणे ः १ (४१), नगर ः ६४ (२६१), अकोला ः ५ (१६३),  वाशीम ः २ (९१), अमरावती ः ११ (३३८), औरंगाबाद ः ४ (७६), बीड : ११ (१३१), भंडारा ः ९ (६६), बुलडाणा ः ९ (२७१), चंद्रपूर ः १ (१८१), धुळे ः ११ (७४), गडचिरोली ः ३ (१३७), हिंगोली ः ६ (१२१), जालना ः १ (१२२), जळगाव ः ११ (१३२), कोल्हापूर ः १९ (११७), लातूर ः२१(३३१),  नांदेड ः १३ (१२७), नंदुरबार ः ६ (५०), नाशिक ः २० (२४२) पालघर ः ०(२५), पुणे ः १८ (१८३), रायगड ः ३ (९५), रत्नागिरी ः २ (५५), सांगली ः १६ (१०८), सातारा ः २१ (२०३), सिंधुदुर्ग ः २ (४२), सोलापूर ः १७ (१०८),  यवतमाळ ः २ (२५४), वर्धा ः २ (७८), नागपूर ः ७ (१०२),  उस्मानाबाद ः ११, परभणी ः १(५७), गोंदिया ः १३.

अशी आहे ‘स्मार्ट’ स्थिती      ‘आत्मा’अंतर्गत ‘स्मार्ट’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी १४३२ शेतकरी उत्पादक कंपन्या पात्र     सहभागासाठी राज्यात ४ हजार ४२९ कंपन्यांनी केला अर्ज      नाशिक, सातारा, अमरावती, बुलडाणा, लातूर, नगर जिल्ह्यांतील कंपन्यांच्या प्रामुख्याने समावेश     ६० टक्के अनुदानासह प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांपर्यंत कंपनीला निधी मिळणार     पूरक उद्योग तसेच प्रक्रियाला प्राधान्य दिले जाणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com