कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा; `प्रहार`ची मागणी

नाशिक : ‘‘रात्रीच्या वेळी पाणी देतानाहोणारी जीवितहानी व नुकसान टाळण्यासाठी शेतीपंपांसाठी दिवसाच वीजपुरवठा करावा,’’ अशी मागणी देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली.
कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा
कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा

नाशिक : ‘‘रात्रीच्या वेळी पाणी देताना होणारी जीवितहानी व नुकसान टाळण्यासाठी शेतीपंपांसाठी दिवसाच वीजपुरवठा करावा,’’ अशी मागणी देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली. याबाबत देवळा नायब तहसीलदार बनसोडे व ''महावितरण''चे उपकार्यकारी अभियंता हेगडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकरी कुटुंबातील सदस्यांना जीव गमवावा लागला. रात्री शेती पिकांना पाणी देणे शेतकऱ्यासाठी धोकादायक ठरत आहे. सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू असताना वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना रात्री हिंस्र प्राण्यांचा हल्ला, साप, विंचू, विद्युत शॉक आदी संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा अखंडित वीजपुरवठा सुरळीत मिळावा, असे निवेदनात नमूद आहे. 

प्रहार शेतकरी संघटना, राज्य कांदा उत्पादक संघटना, किसान क्रांती संघटना यांच्या वतीने कॄष्णाभाऊ जाधव, संजय दहिवडकर, नानाजी आहेर हरिसिंग ठोके, स्वप्नील सूर्यवंशी, रमेश देशमाने, दशरथ पुरकर, बापूसाहेब देवरे, भाऊसाहेब मोरे आदी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. 

कांद्याला पाणी देण्यासाठी वीजपुरवठा महत्त्वाचा आहे. अन्यथा, नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळाल्यास वीज बिल थकविण्यास कोणताही शेतकरी तयार राहणार नाही.

- संजय दहिवडकर, तालुका उपाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, देवळा.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com