पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात निम्म्याने घट

परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने वेळेत वाफसा न झाल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे.
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात निम्म्याने घट
In Pune division, tidal area has halved

पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने वेळेत वाफसा न झाल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल केला आहे. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. चालू वर्षी पुणे विभागात सरासरीच्या ९ लाख ७३ हजार १६२ हेक्टरपैकी अवघ्या ५ लाख ६ हजार ७१५ हेक्टर म्हणजेच ५२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली असल्याचे समोर आले आहे.

बदलत्या वातावरणामुळे ज्वारीचे पीक परवडत नसल्याने शेतकरी शाश्‍वत आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे वळू लागला आहे. यामध्ये शेतकरी कांदा पिकाला सर्वाधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्वारीसह, तेलबियांच्या पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात घट होऊ लागली आहे. त्यामुळे ज्वारीवर पिकांवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होत असून, उत्पादनात कमालीची घट होऊ लागली आहे. 

ज्वारी पिकांवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी ज्वारी पिकांकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे.  गेल्या वर्षी पुणे विभागात सहा लाख १८ हजार ८९७ हेक्टरवर पेरणी झाली होती. सरासरी ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे. त्यातुलनेत चालू वर्षी एक लाख १२ हजार १८२ हेक्टरने, तर सरासरीच्या तुलनेत ४ लाख ६६ हजार ४४७ घट झाली आहे. 

येत्या काळात अशीच स्थिती राहिल्यास आगामी काळात ज्वारी पीक हद्दपार होण्याची शंका अधिकाऱ्यांना आहे. यंदा नगर जिल्ह्यात सरासरीच्या चार लाख ७७ हजार १८ हेक्टरपैकी अवघ्या एक लाख ८४ हजार ७५५ हेक्टर म्हणजेच अवघ्या ३९ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तब्बल दोन लाख २९ हजार १३८ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांने घट झाली होती.

तालुकानिहाय सरासरी पेरणी, कंसात झालेली पेरणी  हेक्टरमध्ये  नगर : नगर ७४६४४ (२४,३९१), पारनेर ९३४७६  (३७१७०), श्रीगोंदा ३७९७२ (२११६९), कर्जत ९३५९० (२८६१८), जामखेड ५६९३४ (४९६१५), शेवगाव २३८५९ (३२०७), पाथर्डी २७९७७ (१४,४६२), नेवासा ८३९५ (१२३१), राहुरी २३५८७ (६५९), संगमनेर २१४८६ (२३६९), अकोले ५९१, कोपरगाव  ३७५८ (४६९), राहाता ६७४३ (२३३), श्रीरामपूर ४००६ (११६२) पुणे : हवेली १२१३ (५६), मुळशी ६३६ (३७४), भोर ३९५० (११०१५), मावळ ९०३ (६०४), वेल्हे ७६ (९८), जुन्नर ७८७८ (३०४०), खेड ८८९३ (९९४४), आंबेगाव ९८४९ (८०६७), शिरूर ३२,८७३ (१४५०६), बारामती ३२८९६ (२१,९४६), इंदापूर १९०३९ (३६३७), दौंड ३४१२ (१६०५), पुरंदर २३७० (१२,३२४) सोलापूर : उत्तर सोलापूर १८४६५ ( a११२९७), उत्तर सोलापूर ३१५६६ (१५९८७), बार्शी ४९५०५ (४५२३१), अक्कलकोट ३७६०८ (२२९८७), मोहोळ ३७००१ (१८९१०), करमाळा ६१९५९ (२४९०३), पंढरपूर ७१४७ (२३९१), सांगोला ३९३२१ (३६३०४), माळशिरस ५९१६ (३२८८), मंगळवेढा ३५९२५ (२८८८९).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.