पुणे जिल्हा परिषद घेणार फिरती पशू चिकित्सालये

पशुपालकांना त्यांच्या पशुधनाला थेट गोठ्यात पशुवैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यासाठी एक अत्याधुनिक फिरते चिकित्सालय खरेदी करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषद घेणार फिरती पशू चिकित्सालये Pune Zilla Parishad will take over Mobile veterinary clinics
पुणे जिल्हा परिषद घेणार फिरती पशू चिकित्सालये Pune Zilla Parishad will take over Mobile veterinary clinics

पुणे : पशुपालकांना त्यांच्या पशुधनाला थेट गोठ्यात पशुवैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यासाठी एक अत्याधुनिक फिरते चिकित्सालय खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देऊन चिकित्सालये खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. कृषी चिकित्सालयानंतर आता १५ पशू चिकित्सालये सेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  जिल्ह्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात तातडीने पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने फिरत्या पशू चिकित्सालयांना मंजुरी देण्यात आली. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्याच्या दुर्गम भागात आधुनिक पशुवैद्यकीय सेवा तातडीने मिळण्याबरोबरच, तातडीच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक (१९६२) देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच वाहन खरेदीची प्रक्रिया सुरू होऊन, चिकित्सालये पशू सेवेसाठी दाखल होणार आहेत. ५० टक्के अनुदानावर बैलजोडी पुरवठा  जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बैलजोडी वाटप देखील करण्यात येणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. दिवसेंदिवस शेतीचे कमी होणारे क्षेत्र, आणि बैलांची कमी होणारी संख्या यामुळे शेतीमध्ये शेणखत, जनावरांचे मूत्र याचा वापर कमी झाल्याने जमिनीची सुपीकता देखील कमी होत चालली आहे. जमिनीची सुपीकता वाढणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बैलांचा वापर होणे गरजेचे आहे. यासाठी २५ हजार रुपयांच्या मर्यादेत ५० टक्के अनुदानावर बैलजोडीचे वाटप केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com