निर्यातक्षम द्राक्षांची दर पाडून खरेदी

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने हजारो द्राक्ष बागायतदारांच्या उपस्थितीत उत्पादन खर्चावर आधारित दहा टक्के नफा गृहीत धरून दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जानेवारी महिन्याचा दर ८२ रुपये आहे.
निर्यातक्षम द्राक्षांची दर पाडून खरेदी

नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने हजारो द्राक्ष बागायतदारांच्या उपस्थितीत उत्पादन खर्चावर आधारित दहा टक्के नफा गृहीत धरून दर निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार जानेवारी महिन्याचा दर ८२ रुपये आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या निर्णयाला हरताळ फासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सुरू असलेल्या शिवार खरेदीत ५५ रुपयांपर्यंत खरेदी होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन खर्चावर आधारित १० टक्के नफा हा धागा पकडून निर्यातीच्या सर्व बाजारपेठांसाठी दरासंबधी निर्णय घेत उत्पादन खर्च व त्यावर नफा गृहीत धरून जानेवारीत प्रतिकिलो ८२, फेब्रुवारीत ७१ व मार्चसाठी ६२ रुपये हा किमान दर निश्‍चित केला आहे. त्यामध्ये विविध वाण, रंग, आकार, गुणवत्ता हे निकष गृहीत धरून या निश्‍चित दरापेक्षा अधिक दरानेच विक्री करण्यात यावी, असा सर्वानुमते निर्णय झाला. या निश्‍चित दराच्या खाली कुणीही विक्री करणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे संघाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

 शेतकऱ्यांनी सांगितली खरेदीची स्थिती कृषी विभागाच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातून १ नोव्हेंबर २०२१ ते १२ जानेवारी २०२२ पर्यंत नाशिक जिल्ह्यातून ६०२३ टन द्राक्ष निर्यात झालेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष मालाची काढणी करताना निर्यातदाराच्या प्रतिनिधीकडून प्रत्यक्ष माहिती घेऊन व उपस्थितीत गुणवत्ता, साखर तपासून मालाची काढणी केली जाते. माल पॅक हाउसला गेल्यानंतर माल नाकारण्याचे प्रकार काही ठरावीक निर्यातदार करत असल्याच्या तक्रारी आहेत. मालाची काढणी सुरू करताना प्रतिकिलो ८२ रुपये दर ठरविले जातात. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर ‘मागणी घटली, दर पडले’ असे सांगून कोंडी केली जात आहे. युरोपसाठी सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ७० रुपयांच्या जवळपास तर रशियासाठी ५५ रुपयांच्या आसपास असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काढणी सुरू झाल्यानंतर एकाच दिवसात बाजार कसे पडतात, मग वाढल्याचे का दाखवीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सध्या तुलनेत रंगीत वाणांना मागणी तर सफेद वाणांना अडचणी येत असल्याची स्थिती आहे.

द्राक्ष बागायतदार संघाचा निर्णय होण्यापूर्वी रशियामध्ये टेंडर भरून दर ठरविल्याने सध्या ठरलेल्या दराप्रमाणे दर देणे शक्य नसल्याचे काही निर्यातदार सांगतात. मात्र संघाने घेतलेला निर्णय रशियातील खरेदीदारांना कळवून नवीन दर वाढून घ्यावेत, अशी मागणी आहे. ठरलेल्या दराखाली व्यवहार नको, अशी भूमिका आहे. यावर बैठक घेऊन दरासंबंधी समिती आवाज उठवेल. शेतकऱ्यांनी ठरलेल्या दराखाली माल देऊ नये; अन्यथा नुकसान वाढणार आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दर देऊन दिलासा द्यावा. - कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com