‘क्यूआर कोड’ने स्ट्रॉबेरीची  बाजारात नवी ओळख

राज्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरी नवीन ओळख निर्माण केली आहे. येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या बॅाक्सवर क्यूआर कोड प्रणाली सुरू केली आहे.
The 'QR code' is for strawberries New identity in the market
The 'QR code' is for strawberries New identity in the market

सातारा ः राज्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरी नवीन ओळख निर्माण केली आहे. येथील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या बॅाक्सवर क्यूआर कोड प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांची फसवणूक टळणार असून, त्यांना येथील स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार आहे. सध्या या उपक्रमात दहा शेतकरी सहभागी झाले आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीचा गोडवा पोचला आहे. राज्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी महाबळेश्‍वर तालुक्यात तीन हजार एकर क्षेत्रावर केली जाते. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथील स्ट्रॉबेरीच्या चवीतील गोडवा वेगळा आहे.

स्ट्रॉबेरीचे आयुष्यमान वाढावे, यासाठी येथील शेतकऱ्यांकडून विशेष प्रयत्न केले आहेत. सतत नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. स्ट्रॉबेरीचे आयुष्यमान वाढण्यासाठी प्रीकूलिंग यंत्रणा, रिपर व्हॅन याद्वारे स्ट्रॉबेरी देशभर पाठवण्यात यश आले आहे. यातून स्ट्रॉबेरीची मागणी वाढत गेली आहे. काही व्यापारी इतर ठिकाणच्या स्ट्रॉबेरी उत्पादककडून स्ट्रॉबेरीची खरेदी करून महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीच्या नावाने पँकिग करून विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत.

यातून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार होत होते. यावर उपाय म्हणून कृषी पणन मंडळ कोल्हापूर व श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था, भिलार यांच्या संयुक्त विद्यमानाने स्ट्रॉबेरीचे क्यूआर प्रणालीबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यातून दहा शेतकरी पुढे आले असून, या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील स्ट्रॉबेरीस क्यूआर कोड ही प्रणाली सुरू केली आहे.

क्यूआर कोड स्कॅन केल्यावर हे समजणार     स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, गाव     स्ट्रॉबरी लागवडीच्या शेतीचे ठिकाण     स्ट्रॉबेरीतील न्यूट्रीशन व्हॅल्यू     स्ट्रॉबेरीचे तोडणी, बॅाक्स पॅकिंगची पद्धत     सेंद्रिय स्ट्रॉबेरी असेल तर त्यांचे प्रमाणपत्र यामध्ये दिसणार     शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी बद्दलचा छोटासा व्हिडिओ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com