निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद उत्पादन गरजचे -कृषिमंत्री दादा भुसे

हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. भविष्यात हळद निर्यातीत संधी आहेत. त्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
 निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद उत्पादन गरजचे -कृषिमंत्री दादा भुसे
Quality for export Turmeric production needs - Agriculture Minister Dada Bhuse

हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. भविष्यात हळद निर्यातीत संधी आहेत. त्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे. मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.२३) कृषी विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ऑनलाइन राज्यस्तरीय हळद परिषदेच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, फलोत्पादन संचालक कैलास मोते, संशोधन कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, स्पायसेस बोर्डाच्या मुंबई येथील सहाय्यक संचालक (विपणन) ममता रुपोलिया, कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर आदी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, ‘‘हळद परिषदेच्या माध्यमातून मूल्य साखळीचे तंत्रज्ञान यातून चांगले मुद्दे समोर येतील. कृषी विभागाला मार्गदर्शक ठरतील. हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीचा अहवालाची धोरण आखायला मदत होईल.’’ खासदार पाटील म्हणाले, ‘‘विविध उद्योगात हळदीची मागणी वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या नगदी पिकाचा काढणीपश्‍चात खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’ 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘वसमत येथे हळद संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परभणी येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधन तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकीकरणावर संशोधनासाठी पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण उतिसंवर्धित रोपे निर्मिती प्रयोगशाळा सज्ज आहे.’’ 

मोते म्हणाले, ‘‘राज्यातील सुमारे साडेपाच हजार गावांत हळद लागवड होते. क्षेत्र वाढत आहे. उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. दर्जेदार बेणे उपलब्धता.’’ माने म्हणाले, ‘‘हिंगोली जिल्ह्यातील हळदीला जीआय मानांकनासाठी मिळाले पाहिजे. काढणीपश्‍चात खर्च कमी करण्यासाठी संसोधन करणे आवश्यक आहे.’’

डॉ. वासकर म्हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाकडे हळदीच्या १५ वाणांचा संग्रह आहे. त्यातून या भागासाठी लागवडीसाठी योग्य वाणाची शिफारस करण्यात आली.’’ रुपोलिया म्हणाल्या, ‘‘निर्यातीसाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन, कुरकुमीनचे जास्त प्रमाण असलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने पीकविलेल्या हळदीचे उत्पादन घेणे आवश्यक आहे.’’ परिषदेत शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी, तज्ज्ञ सहभागी झाले होते.

वायगाव हळदीच्या  निर्यातीला प्रोत्साहन देणार -  मंत्री सुनील केदार  

वर्धा : वायगाव हळदीला भौगोलिक नामांकन मिळाले आहे. त्यामुळे या हळदीची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी संशोधक संस्थांच्या पूरक प्रयत्नांची गरज भासणार आहे. गुणवत्ता राखल्यास या माध्यमातून हळद निर्यातीसाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केले. 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित हळद परिषदेत ते बोलत होते. आमदार रणजित कांबळे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, सुनील राऊत, सेलू बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, संजय तपासे, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ. साईनाथ हाडोळे, ‘आत्मा’ प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांची या वेळी उपस्थिती होती. 

केदार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने माती परीक्षण करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. माती परीक्षणाचा पर्याय शेतकऱ्यांना जमिनीत उपलब्ध नेमक्या घटकांची माहिती करून देतो. त्याआधारे शेतकऱ्यांना जमिनीला आवश्यक तितक्याच अन्नद्रव्यांची मात्रा देणे शक्य होते. यातून उत्पादन खर्चही कमी होतो. माती परीक्षण सुविधा देताना चांगल्या दर्जाचे बियाणे व कृषिमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्याप्रमाणे कोणती पिके घ्यावीत हे ठरवता येईल.

सेंद्रिय शेतीवर भर देताना शेतकऱ्यांनी फलोत्पादन करावे. वायगाव परिसरातील हळदीचा दर्जा टिकविता यावा याकरिता नवे तंत्रज्ञान व चांगल्या दर्जाच्या बेण्याचा वापर व्हावा. हळदीला बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच इतर देशात हळदीच्या निर्यातीसाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.’’ या वेळी सुधीर कोठारी, साईनाथ हाडोळे यांनी मार्गदर्शन केले. विद्या मानकर यांनी प्रास्ताविकातून हळद परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.