कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर शिवसेनेचे ‘रास्ता रोको’

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून कापूस व सोयाबीन उत्पादकांसह शिवसेनेच्या वतीने अमरावती-यवतमाळ मार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यात आले.
On the questions of cotton growers Shiv Sena's 'Rasta Roko'
On the questions of cotton growers Shiv Sena's 'Rasta Roko'

अमरावती ः केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून कापूस व सोयाबीन उत्पादकांसह शिवसेनेच्या वतीने अमरावती-यवतमाळ मार्गावर ‘रास्ता रोको’ करण्यात आले. मंगळवारी (ता. २७) आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती.

या वेळी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. माजी खासदार तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शाम देशमुख, माजी जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी, युवा सेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर, डॉ. प्रमोद कठाळे, स्वराज ठाकरे, रेखा नागोलकर, नितीन हटवार, छाया भारती, बाळासाहेब भागवत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. जागतिकस्तरावर उत्पादकतेत घट आल्याने या वर्षी पहिल्यांदाच खुल्या बाजारात कापूस, सोयाबीनच्या दरात तेजी आहे. चार पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जात असतानाच केंद्र सरकार मात्र या भागातील शेतकऱ्यांप्रती अन्यायाचे धोरण अवलंबित आहे. आयातीला प्रोत्साहन देत दर पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. शेतकऱ्यांची संपन्नता केंद्र सरकारच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने व्यापारी धर्जिण्या आपल्या धोरणात बदलाची मागणी करीत, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले. कापूस, सोयाबीन उत्पादकांचा हा मोर्चा गजानन महाराज मंदिर चौकातील पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू झाला. शहरातील मुख्य मार्गाने तो पुढे जात बसस्थानक चौकात स्थिरावला.

अरुण लहाबर, सुरज औतकर, अक्षय काकडे, पवन पुसदकर, पवन खेडकर, निखील मोरे, आशिष हटवार, भावेश भांबुरकर, शुभम सावरकर, अक्षय तुपटकर, मंगेश दांडगे, अजय काळे, अशिष भाकरे, ज्ञानेश्‍वर लांजेवार, विलास देशभ्रतार यांचा आंदोलनात सहभाग होता. या वेळी काही प्रश्‍न हे राज्य सरकारशी संबंधित असल्याने त्याच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या मागण्यांकडे वेधले लक्ष    शेतीमाल दरातील तेजीच्या पार्श्‍वभूमीवर आयात निर्यात धोरणात बदल करू नये    सोयाबीनला प्रति क्‍विंटल दहा हजार दर मिळावा    कापसाचा हमीभाव १२ हजार रुपये प्रति क्‍विंटल असावा   शेतीला दिवसा वीजपुरवठा करा    पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा    कृषी साहित्यावरील जीएसटी रद्द करावा    शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा भरपाई मिळावी    वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज    परदेशातून शेतीमालाची आयात थांबवा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com