मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर रब्बी

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१ लाख २१ हजार ७३० हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. अपेक्षीत क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झालीच नाही. हरभऱ्याची सरासरीच्या पुढे जाऊन दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मराठवाड्यात २१ लाख  २१ हजार हेक्‍टरवर रब्बी
Rabbi on 21 lakh 21 thousand hectares in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१ लाख २१ हजार ७३० हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. अपेक्षीत क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झालीच नाही. हरभऱ्याची सरासरीच्या पुढे जाऊन दीडपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहेत. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र १६ लाख ९१ हजार १४३ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात सरासरीच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. गहू, मका पिकाचीही अपेक्षित क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या रब्बी ज्वारीवर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. गव्हाचे पीक वाढीच्या व बऱ्याच ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे.  त्याची स्थिती समाधानकारक आहे. हरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. 

मका पीक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी मक्यावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. करडईचे पीकही सद्यःस्थितीत गोंडे लागण्याच्या अवस्थेत असून करडईवर माव्याचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.

लातूर कृषी विभागात ७४ टक्के ज्वारी

लातूर कृषी विभागातील ५ जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची ७४ टक्‍के, तर औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत ७७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची लातूर कृषी विभागात सरासरीच्या ९६ टक्‍के, तर औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या दीडपटीपेक्षा जास्त १६५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या १८२ टक्‍के, तर लातूर कृषी विभागात सरासरीच्या १८३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com