नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणी

नांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत रब्बीची पेरणीही विक्रमी क्षेत्रावर झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणी
Rabbi record sowing in Nanded district

नांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत रब्बीची पेरणीही विक्रमी क्षेत्रावर झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या २४० टक्क्यांनुसार तीन लाख ३५ हजार ७८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर हरभऱ्याचा समावेश आहे. यंदाची रब्बीतील पेरणी मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा १३६ टक्के पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापुरी बंधारे, उच्च पातळी बंधाऱ्यांत शंभर टक्के पाणीसाठा झाला. परिणामी, जमिनीतील जलस्रोत बळकट झाले. रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला.  आजपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या २४० टक्क्यांनुसार तीन लाख ३५ हजार ७८६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर हरभऱ्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८८ हजार ३५ हेक्टर आहे. प्रत्यक्षात दोन लाख ६७ हजार ५७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या सोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र १८ हजार ४६३ हेक्टर, तर पेरणी ३० हजार ८०५ हेक्टरवर झाली. रब्बी ज्वारीचे पेरणीक्षेत्र २६ हजार ९५१ हेक्टर आहे, असे चलवदे  म्हणाले. 

यंदा पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीपेक्षा अधिक राहिले. त्यामुळे रब्बी हंगामात विक्रमी क्षेत्रावर पेरणी झाली. यात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन बिजोत्पादनाला प्राधान्य दिले. सोयाबीन बियाण्यांची गरज घरच्या बियाण्यांतून भागवावी. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.