वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर; विजेची समस्या कायम

रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला असला तरी विजेची समस्या संकट बनून शेतकऱ्यांच्या डोक्यावर आजही कायम आहे. विजेचे नियोजन नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत.
वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर; विजेची समस्या कायम
Rabbi season half in Washim district; The power problem persists

रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला असला तरी विजेची समस्या संकट बनून शेतकऱ्यांच्या डोक्यावर आजही कायम आहे. विजेचे नियोजन नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत.

जिल्ह्यात एकूण ८९८  प्रकल्प आहेत. त्याखाली एक लाख ३१ हजार १११ हेक्टर शेती सिंचनाखाली आहे. परंतु , त्या प्रमाणात या प्रकल्पांवरून शेतीला पाणी पुरवण्यासाठी शासनाने विजेचे नियोजन केले नाही. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लघु, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, वळवणी बंधारे, असे एकूण ८९८ लहान-मोठे प्रकल्प आहेत. यापैकी काही मोठ्या प्रकल्पावरून शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर, उर्वरित इतर प्रकल्प शेती सिंचनाच्या हेतूने तयार करण्यात आले आहेत.

या प्रकल्पावरून १ लाख ३१ हजार १११ हेक्टर शेती सिंचनाखाली येते. यासाठी महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्ची घातले. परंतु, या सिंचन क्षेत्रासाठी वाढीव वीजपुरवठा करण्यासाठी या परिसरात कुठेही ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचन समस्या कायमच आहे.

दररोज विजेच्या समस्येबाबत शेतकऱ्यांसह विविध सामाजिक संघटना तक्रारी करतात. या वर्षी पावसाळा भरपूर झाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मात्र, वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला. तरीही विजेची समस्या सुटलेली नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसरात्र राबावे लागत आहे. पाणीसाठा उपलब्ध असला तरी विजेचा पुरवठा नियमित केला जात नाही. त्यामुळे ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com