पाऊस, डाऊनी मिल्ड्यूमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका

मॉन्सूनोत्तर पाऊस, खराब हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे वीस हजार एकरांतील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या असून, डाऊनी मिल्ड्यू, भुरी, करपा या रोगांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत.
Rain, downy mildew hit vineyards hard
Rain, downy mildew hit vineyards hard

सोलापूर ः मॉन्सूनोत्तर पाऊस, खराब हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे वीस हजार एकरांतील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या असून, डाऊनी मिल्ड्यू, भुरी, करपा या रोगांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. बागेतील खराब द्राक्ष घड थेट बांधावर आणून टाकण्यात येत आहेत. जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांचे सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानातून लाखमोलाचे द्राक्षासारखे पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांचा वापर करीत आहेत. तरीही डाऊनी रोगाने बाधित झालेल्या बागा आटोक्यात येत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. जिल्ह्यात पंढरपुरातील कासेगाव, सरकोली, बार्शीतील पिंपरी, मळेगाव, उत्तर सोलापुरातील नान्नज, बीबीदारफळ, पडसाळी, होनसळ, आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे, निंबर्गी, मंद्रूप, कासेगाव, उळे या भागांत द्राक्षक्षेत्र आहे.  

दक्षिण सोलापुरातील निंबर्गी येथील शेतकरी गंगाधर बिराजदार यांच्या सहा एकरांतील बागेवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाला असून, मजुरांकडून घड काढून ते बांधावर आणि रस्त्यावर आणून टाकत आहेत. मल्लिकार्जुन बिराजदार -पाटील, सुशांत लाडे, राजेश गुडेलू, कल्याणी शिरगोंडे, महादेव इंगळगी, क्रांतीकुमार इंगळगी, महादेव फुलारी, शरणप्पा चडचणे, धरेप्पा सोरेगाव, विकास बिराजदार, विशाल बिराजदार, प्रणव बिराजदार, नागनाथ बालगाव, विठ्ठल बालगाव, मल्लिनाथ बालगाव, गैबीसाहेब इनामदार, पैगंबर शेख यांच्यासह सादेपूर, बाळगी, विंचूर, कंदलगाव आदी भागांतील द्राक्ष बागांवर डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावामुळे संकट कोसळले आहे.

माझ्या सहा एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने अडचणी येत आहेत. कोणीच दखल घेत नाही. एकूण खर्च आणि नफ्याचे गणित जुळत नाही. आर्थिकदृष्ट्या फार अडचणीत आलो आहोत.  - गंगाधर बिराजदार, द्राक्ष उत्पादक, निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com