पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्या. पूर्व विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. उर्वरित जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपात पेरणी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणात भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून, काही ठिकाणी रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. रत्नागिरी येथे सर्वाधिक ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यातील अनेक भागांत मॉन्सूनची गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारी (ता. २४) व मंगळवारी (ता. २५) दिवसभर या भागांत ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातही हवामान अंशतः ढगाळ होते. मात्र, मॉन्सून राज्याच्या अनेक भागांत जवळपास दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. हा पाऊस भात शेतीसाठी पोषक असल्याने भात रोपे चांगलीच तरारली आहेत. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच खान्देशातही हवामान ढगाळ होते. सोमवारी दुपारनंतर या भागांतील अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर धुळे जिल्ह्यातील जवखेडे येथे सर्वाधिक ७५.३ मिलिमीटर पाऊस पडला, तर सांगलीतील मलकापूर येथे ६६ मिलिमीटर पाऊस पडला. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील अनेक भागांतही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला, तर जालना, बीड, लातूर, उस्नानाबाद, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. लातूरमधील पोहरगाव येथे ६४.८ मिलिमीटरची सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जालनामधील तीर्थपुरी, उस्मानाबादमधील जागजी, परभणीतील माखणी या ठिकाणीही जोरदार पाऊस पडला. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या भागांत कपाशी लागवडीची तयारी सुरू झाली असून खरिपातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पूर्व पट्ट्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हवामान ढगाळ राहणार आहे. आज (ता. २६) कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. तर गुरुवार ते शनिवार या दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची सरी पडणार असून अधूनमधून ऊन सावल्याचा खेळ सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. कोकण ः ठाणे ४६, दहिसर २५.३, ठाकुरली ३७, शहापूर २९.३, किनहवळी ३९.३, गोरेगाव ३६.५, महाड २९, कोलाड २४, पोलादपूर २०, कोंडवी ६७, वाकण २२.५, दाभोळ २४.५, आंजर्ले ६६.८, वाकवली २८.३, वेळवी २२.५, मंडणगड ४१.५, जयगड ३४.८, फणसवणे २६.३, कोंडगाव ६१.८, देवळे ५७, देवरुख ९०.८, लांजा २४.८, भांबेड ४८.३, विलवडे ३५, शिरगाव ३३.५, पाटगाव ५६.५, बापरडे २५.३, तालेरे २७, वाडा ४७.५, कोणे ३२.५, बोयसर ३४.८, विक्रमगड ७३.५, तलवड २५.५. मध्य महाराष्ट्र ः मालेगाव ५२.३, नांदगाव ४९.५, ताकेत २५, त्रिंबकेश्वर ३२.८, दुसाणे ३२.५, निजामपूर २४.५, ब्राह्मणवेल ३०, कुडाशी २८.३, उमरपट्टा २४, दहिवेल २५.५, बोराडी ६१.३, अर्थे ५५.३, जवखेडे ७५.३, सांगवी ३७, रनाळा ४३.३, शनिमांडळ ४७.३, सारंगखेडा २३.३, वडाळी ४७.५, श्रीगोंदा ४६.५, काष्टी ३३.५, बेलवंडी ३०.५, चिंभळा ४७.५, कोळेगाव ३१.८, संगमनेर ३८, धांदरफळ २१.३, तळेगाव ३२.५, समनापूर २३.३, घारगाव ५०, डोळासणे ३३.३, साकूर २५.५, पिंपरणे २७, श्रीरामपूर २१.३, उंदीरगाव २७, कोथरूड ४२.८, भोलावडे २५.५, संगमनेर ४६.८, विंझर २०.८, अंबावणे ४७.८, वडगाव आनंद ३६.८, कळंब ५२.३, रांजणगाव ४५.८, निमगाव ५०.५, कुंभारवळण २१.३, वाल्हा ५८.५, वडाळा २०, सोलापूर २४, वळसंग २२.३, पांगरी ३९.५, टाकळी २७.३, सावळेश्वर २९.५, भंडीशेगाव ३३.५, भाळवणी ४६.५, पुळूज २८, चळे५७.८, तुंगत २१.५, कासेगाव २६.३, इस्लामपूर ३५.८, सदाशिवनगर २८.८, सातारा ४०, वर्ये ४१.५, तासगाव २५, कराड ४९, सुपने ४२, सैदापूर ३०.३, मलकापूर ६६, शिरंबे ४७, किन्हई ३०.५, मायणी ५२.८, निमसोड ३७, होळ ५६, वाठार-नि ६०.३, संख ३४.३, कवठेमहांकाळ २९.५, हिंगणगाव ३६.३, शाळगाव २९.३ मराठवाडा ः पांचवडगाव १९.८, घनसांगवी २४.३, तीर्थपुरी ५७.५, शिरूर कासार १८, हारंगूळ २४, मुरूड ५४.३, किनगाव ४२.५, पोहरगाव ६४.८, पानगाव २९, कारेपूर २३.५, जळकोट ५०, घोणशी २२.५, जागजी ६०, गोविंदपूर २४.५, तरोडा ३०.८, कुंडलवाडी २९.३, जांब ३३, निवघा २२.८, मालेगाव २५.८, माखणी ५५.३, कांतेश्वर ३४.८. विदर्भ ः कळमनुरी ३७.५, आंबा ४२, हट्टा ५५.३, पानकनेरगाव ३६.३, कवठळ २२.३, बीबी ३६.५, आसेगाव १९.३.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.