सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार 

दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. आज (ता. १९) आणि उद्या (ता. २०) कोकण व विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील.
पावसाचा प्रभाव कमी होणार 
पावसाचा प्रभाव कमी होणार 

पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. आज (ता. १९) आणि उद्या (ता. २०) कोकण व विदर्भाच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवारपासून राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार असून, विदर्भाच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलले आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून चांगलेच ऊन पडत आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. हवेत बऱ्यापैकी गारवा तयार झाल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. उन्हाळ्यात असह्य झालेला उकाडा आता कमी होऊ लागल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

पूर्व विदर्भात होत असलेल्या हलक्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसची घट झाली. त्यामुळे कमाल तापमान २९ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २० ते ३७ अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान २९ ते ३५ अंश सेल्सिअस, तर कोकणात २९ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  शनिवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ  सोमवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ  मंगळवार ः विदर्भ  शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) २९.६ 
  • अलिबाग - ३१.७ 
  • रत्नागिरी - २९.४ 
  • डहाणू - ३१.९ 
  • पुणे - २७.८ 
  • कोल्हापूर - २६.६ 
  • महाबळेश्‍वर - २० 
  • मालेगाव -- ३७.४ 
  • नाशिक - ३०.३ 
  • सांगली - २६.२ 
  • सातारा - २४.२ 
  • सोलापूर - ३२.४ 
  • औरंगाबाद - ३२.६ 
  • परभणी -- २९.८ 
  • बीड -- ३५ 
  • अकोला - ३५.१ 
  • अमरावती - ३२.८ 
  • बुलडाणा - २९ 
  • ब्रह्मपुरी - ३५.७ 
  • चंद्रपूर - ३४ 
  • गोंदिया - ३५ 
  • नागपूर - ३५.६ 
  • वर्धा - ३५.८ 
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com