विदर्भात पावसाचा अंदाज

राज्याच्या काही भागांत सकाळी धुक्यासह दुपारी ढगाळ हवामान पहावयास मिळत आहे. गुरुवारी (ता. १३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.२ सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
विदर्भात पावसाचा अंदाज
Rainfall forecast in Vidarbha

पुणे : राज्याच्या काही भागांत सकाळी धुक्यासह दुपारी ढगाळ हवामान पहावयास मिळत आहे. गुरुवारी (ता. १३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.२ सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. १४) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाना, चंडीगडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी दाट धुक्यासह, दिवसाच्या तापमानात घट झाल्याने थंड दिवस अनुभवायला मिळाला.

उत्तरेकडील हे थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली. तर अनेक ठिकाणी पहाटे दाट धुक्याची चादर पसरत आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल किमान तापमानातील चढ-उतार दोन दिवस कायम राहणार असून त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.१ (१६), नगर २५.६ (१३.४),  धुळे २३ (७.२), जळगाव २४.५ (१२), कोल्हापूर २७.५ (१३.१), महाबळेश्‍वर २२ (११.५), मालेगाव - (१२.४), नाशिक २४.४ (११.६), निफाड २४.५ (८.८), सांगली २७.८ (१३.५), सातारा २७.१ (१२.३), सोलापूर ३१ (१६.२), सांताक्रूझ २७.१ (१६), अलिबाग - (१७), डहाणू २४ (१५.३), रत्नागिरी २८ (१७.४), औरंगाबाद २४ (१२.५), नांदेड २५.८ (१७), उस्मानाबाद - (१५), परभणी २४.८ (१४.४), अकोला २५.४ (१५.६), अमरावती २८.४ (१४.३), बुलडाणा २२ (१३), ब्रह्मपुरी २४.६ (१५.४), चंद्रपूर २३.५ (१५.८), गडचिरोली २३ (१४), गोंदिया २३.२ (११.८), नागपूर २३.८ (१४), वर्धा २४ (१३.६), वाशीम २५ (१२), यवतमाळ २९.५ (१४).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.