नांदेड जिल्ह्यात पावसाची ओढ; पेरण्या खोळंबल्या

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसह कपाशी, हळद, तूर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरवात केली. परंतु मागील तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे.
Rainfall in Nanded district Longing; The sowing was stoped

शनिवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.   जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत १६६.४० मिलीमीटरनुसार २०.४० टक्के पावसाची नोंद झाली. यामुळे शेतकरी पेरणीच्या कामांना लागले. शेतकऱ्यांनी जिरायती भागात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांची पेरणी केली. शनिवारपासून (ता.१९) पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे थांबवली आहेत.

शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून सोयाबीनला तुषार संचाव्दारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. परंतु पाणी नसलेले शेतकरी आकाशाकडे टक लावून आहेत. यंदा सोयाबीन बियाणांची टंचाई आहे. 

सोयाबीन पेरून पाच-सहा दिवस झाले. या काळात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पिकाला तुषार संचाद्वारे पाणी द्यावे लागले. - परमेश्वर शिंदे, शेतकरी, धनंज बु, ता. लोहा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com