राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्य

राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता. १६) पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Rains likely in the state from tomorrow
Rains likely in the state from tomorrow

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता. १६) पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, दिसा, अहमदाबाद, इंदूरपर्यंतचे तीव्र कमी दाब क्षेत्र, ओडिशा, गोपाळपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत आहे. 

वादळी प्रणालीची तीव्रता ओसरली ओडिशाच्या किनारपट्टीलगत जमिनीवर आल्यानंतर वादळी प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली आहे. छत्तीसगड आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. ही प्रणाली मध्य प्रदेशकडे सरकत असताना निवळत जाणार आहे. गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. आज (ता. १५) कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com