कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान 

राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Rainy climate in Konkan, Central Maharashtra, Marathwada
Rainy climate in Konkan, Central Maharashtra, Marathwada

पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. यातच राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  श्रीलंका आणि लगतच्या कोमोरीन समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आज (ता. २९) अरबी समुद्रात येऊन उत्तरेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. यातच दक्षिण अंदमान समुद्रात मंगळवारपर्यंत (ता. ३०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कोकण वगळता उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्याही खाली आले आहे. रविवारी (ता. २८) यवतमाळ येथे नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३०.८ (१३.८), नगर ३१.०(-), जळगाव ३१.६ (१२.६), कोल्हापूर २९.४ (१७.५), महाबळेश्वर २४.९(१४.०), नाशिक २९.९ (१५.५), निफाड २९.२ (१५.०), सांगली २९.६(१६.८), सातारा २९.१(१८.२), सोलापूर ३१.६ (१५.२), सांताक्रूझ ३४.८(२२.५), डहाणू ३२.९ (२०.०), रत्नागिरी ३५.६ (२१.६), औरंगाबाद २९.५ (१२.७), नांदेड ३२.८ (१५.०), उस्मानाबाद ३१.१ (१३.६), परभणी २९.६ (१३.५), अकोला ३२.२ (१५.४), अमरावती ३१.० (१४.०), ब्रह्मपूरी ३४.५ (१४.२), बुलडाणा ३०.२ (१५.२), चंद्रपूर २९.८ (१४.०), गडचिरोली ३०.०(१६.४), गोंदिया ३०.२ (१२.८), नागपूर ३०.८ (१२.४), वर्धा ३०.२(१३.९), वाशीम ३२.५ (१६.०), यवतमाळ ३१.० (१२.०).   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com