राज्यात रोहयोची ४४ हजार कामे सुरू 

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत राज्यात सध्या सुमारे ४४ हजार कामे सुरू आहेत.
 राज्यात रोहयोची ४४ हजार कामे सुरू 
rajat royochi 44 thousand work started

पुणे  नगर ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत राज्यात सध्या सुमारे ४४ हजार कामे सुरू आहेत. या कामांवर सुमारे पावणे पाच लाख मजूर काम करत आहेत. दररोज साधारण पंचवीस हजार मजुरांच्या उपस्थिती कमी जास्त होत आहे.  ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (नरेगा) घरकुल, सिंचन विहिरी, वैयक्तिक शौचालय, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, शेती तलाव यासह सुमारे २६२ प्रकारची कामे करता येतात. मागेल त्याला रोजगार, अशी संकल्पना असलेल्या या योजनेतून वर्षभरात शंभर दिवस कामे देण्याची सरकारकडून हमी दिली जाते. त्यासाठी मजुरांना जॉबकार्ड दिलेले आहे. मपंचायतीमार्फत कामाची मागणी केली जाते.  राज्यात सुमारे २ कोटी ६६ लाख ३३ हजार मजुरांनी जॉब कार्डसाठी नोंदणी केलेली आहे. त्यातील ६२ लाख २९ हजार मजूर कामांबाबत सक्रिय आहे. त्यात २६ लाख ९२ हजार महिला मजूर आहेत. राज्यात २८ हजार ३७४ ग्रामपंचायती असून, सध्या १२ हजार ग्रामपंचायती अतर्गत ४४ हजार कामे सुरू आहेत. या कामावर सुमारे ४ लाख ६७ हजार मजूर काम करत आहेत. सर्वाधिक अमरावतीत ८४ हजार मजूर काम करत आहेत. त्यापाठोपाठ भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, लातूर, यवतमाळ, पालघर, नांदेड, नंदुरबार जिल्ह्यात मजूर संख्या अधिक आहे. मात्र राज्याचा विचार करता मजुरांची उपस्थिती आणि कामांची मागणीही कमीच आहे. 

कोरोनाच्या दक्षतेबाबत आदेश नाहीत  सहा महिन्यानंतर पुन्हा राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. चार दिवसांत रुग्णसंख्या वाढीचे परिणामही दिसून येत आहेत. कोरोनाचा परिणाम नरेगाच्या कामांवरीलही मजुरांत होत आहे. पाच दिवसांपूर्वी राज्यात ४७ हजार कामे सुरू होती आणि त्यावर ५ लाख ३१ हजार मजूर काम करत होते. १३ जानेवारीच्या अहवालानुसार ४३ हजार ८८६ कामे सुरू असून, या कामांवर ४ लाख ६७ हजार मजूर काम करत आहेत. पाच दिवसांत सुमारे ६४ हजार मजुरांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार या बाबत दक्ष झाले असले तरी मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मजुरांनी काय काळजी घ्यावी?, या बाबत मात्र वरिष्ठ पातळीवरून काहीही आदेश नाहीत, असे नगर जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागातून सांगण्यात आले. 

रोहयो कामांवर दृष्टीक्षेप...  सुमारे २६२ प्रकारची कामे सुरू  २ कोटी ६६ लाख ३३ हजार मजुरांची जॉब कार्डसाठी नोंदणी  ६२ लाख २९ हजार मजूर कामांवर सक्रिय  २६ लाख ९२ हजार महिला मजूर  १२ हजार ग्रामपंचायतींमध्ये ४४ हजार कामे सुरू  सर्वाधिक अमरावतीत ८४ हजार मजूर कार्यरत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.