
दिघांची, जि. सांगली ः शंभर वर्षांपूर्वीचा म्हणजे ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव दहा वर्षांनंतर दमदार झालेल्या परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरला असून, २५ फूट पाणी असल्याने तलावाच्या सांडव्यावरून शनिवारी (ता. २६) सकाळपासून पडण्यास सुरवात झाली. यामुळे दुष्काळी पट्टयातील शेतकरी सुखावला असून, सांगली, सोलापूर, सातारा तीन जिल्ह्यांतील गावांना ४४,२०६ एकर क्षेत्रातील शेतीसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. दुष्काळी पट्टयात पडलेल्या परतीच्या पावसामुळे माणगंगा नदीवर असणारे आंधळी धरण पूर्ण भरून म्हसवडपर्यंत माणगंगा नदीला पूर आल्याची परिस्थती निर्माण झाली होती. हेच पाणी पुढे राजेवाडी तलावात आल्याने २००९ नंतर तलाव पूर्ण क्षमतेने भरला. यापूर्वी उरमोडी व जिहे कटपूरचे पाणी सोडण्यासाठी जनतेने रेटा लावला होता. ब्रिटिश राजवटीत १८७६ मध्ये माणगंगा नदीवर विक्टोरिया राणीने राजेवाडी येथे मध्यम प्रकल्प धरणाच्या उभारणीसाठी सुरवात करून १९०१ मध्ये पूर्ण केला. तत्कालीन तलावाची साठवण क्षमता ३०७० दशलक्ष घनफूट होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेल्या गाळामुळे ती १४९३ दशलक्ष घनफूटने घटली आहे. तलावास धोका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाच्या भरावावर चिलारीची मोठी झाडे असल्याने त्यांच्या मुळांमुळे व काही ठिकाणी सांडव्याची दगडे निकळू लागल्याने तलावास धोका पोचू शकतो. याची संबंधित विभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. तलावाची वैशिष्ट्ये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.