जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या दरात वाढीचा कल 

जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक पातळीवर कोरोनाचे निर्बंध सैल होत आहेत. कोरोना तिसऱ्या लाटेचे सावट कमी होत असल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे किमतीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
 जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या दरात वाढीचा कल 
Raw in the global market Rising trend in sugar prices

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक पातळीवर कोरोनाचे निर्बंध सैल होत आहेत. कोरोना तिसऱ्या लाटेचे सावट कमी होत असल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे किमतीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, साखर दरात वाढ होऊ शकते, असा सूत्रांचा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यात १० जानेवारीला जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेचे दर १७.६० सेंट प्रति पौंड होते. त्यात सुधारणा होऊन २० जानेवारीला १९.३० सेंट प्रति पौंड, अशी दरवाढ झाली.  जागतिक बाजारपेठेत १८ नोव्हेंबरला २०.६८ सेंट प्रति पौंडपासून दरात जी घसरण सुरू होती, ती १० जानेवारीपर्यंत कायम राहिली. १७.६० सेंट प्रति पौंडपर्यंत दर घसरत होते. ही घसरण १७ ते १८ टक्क्यांपर्यंत होती. नोव्हेंबर १५ ते २० तारखेला भारतीय कारखानदारांनी टनाला ३२००० ते ३२७०० या दराने कच्च्या साखरेचे प्रति टन एक्स मिल, या दराने निर्यात करार केले. त्यानंतर २९००० ते २९५०० पर्यंत दर खाली आले होते. 

देशांतर्गत बाजारात मंदी कायम  जागतिक बाजारपेठेतील घसरणीबरोबर भारतीय देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर मागील दोन महिन्यांत जवळपास ३००० प्रति क्विंटलपर्यंत घसरले. भारतात सध्या विक्रमी साखर उत्पादन होणार आहे. नजीकच्या काळात कोणताही सन नसल्याने तसेच थंडीमुळे शीतपेय उत्पादक कंपनीकडून साखरेची मागणी कमी झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कमी आहेत.  मागील आठवड्यात भारतीय कारखानदारांनी ३१००० ते ३१५०० रुपये प्रति टन एक्स मिल या दराने फेब्रुवारी व मार्च या कालावधीसाठी करार केले आहेत. ३१५०० ते ३२२०० प्रति टन एक्स मिल या दरात पांढरी साखर (व्हाइट शुगर) निर्यात करार झाले आहेत. या हंगामात व्हाईट शुगरला जागतिक बाजारपेठेत मागणी कमी आहे. भविष्यात जादा दरवाढ होईल, या आशेवर न बसता भारतीय कारखानदारांनी प्रत्येक दरात निर्यात करार केल्यास त्यांना सरासरी दर चांगला मिळू शकतो. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दरात वाढ होत असून, कारखानदारांनी प्रत्येक दरात साखर विकत राहणे फायद्याचे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

प्रतिक्रिया  मागील तीन महिन्यांत साखरेच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत राहिली. कारखानदारांनी साखर निर्यातीचे योग्य नियोजन करावे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या खरेदीदार कंपन्यांकडून अजूनही भारतीय कच्च्या साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे व ती मे महिन्यापर्यंत राहील. हे गृहीत धरून नियोजन केल्यास निर्यात फायदेशीर ठरेल. 

-अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com