रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चा

नांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील दत्तक गावातील १२०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संचिका, गटशेतीचे अनुदान व शासकीय अनुदानाविषयी प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत.
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चा
Rayat Kranti's protest on Baroda Bank

नांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील दत्तक गावातील १२०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संचिका, गटशेतीचे अनुदान व शासकीय अनुदानाविषयी प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने बँकेच्या मुखेड शाखेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 

तालुक्यातील येवती, वसुर, तारदडा धनज, जामखेड, पिंपळकुंठा, कुंद्राळा, पळसवाडी यासह अन्य दत्तक गावातील वर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संचिका बँकेकडे प्रलंबित आहेत. यासाठी शेतकरी खरीप हंगामापासून बँकेच्या चकरा मारत आहेत. पण, बँक कुठलीही दखल घ्यायला तयार नसल्याने रयतने मोर्चा काढून बँकेविरोधात आवाज उठवला. या वेळी संघटनेच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे माजंरमकर यांच्यासह मोर्चाचे नियोजनकर्ते संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसणे यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे, डॉ. रणजित काळे, नगरसेवक विनोद आडेपवार, विजय किनाळकर, गोविंद घोगरे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, मराठवाडा महिला अध्यक्ष संगीता कोल्हे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचाळ, मुखेड तालुकाध्यक्ष नवनाथ तारदकर, शहराध्यक्ष संगीता जाधव, गोविंद घोगरे, मैनु शेख, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.