सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित ११३ गावांत शेतीची पुनर्बांधणी सुरू

सातारा : गतवर्षी जुलै- ऑगस्टमध्ये महाबळेश्वर व वाई तालुक्यांतील अतिवृष्टीने हानी झालेल्या शेतीच्या पुनर्बांधणीचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ८१ व वाई तालुक्यातील ३२ गावांतील वाहून गेलेल्या शेतीची दुरुस्तीचे काम सुरू झाली आहेत.
 Reconstruction of agriculture started in 113 rain-affected villages of Satara district

गतवर्षी महाबळेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन ओढे, नदी, नाल्यांचे प्रवाह बदलले. जिल्हा प्रशासनाने ११३ बाधित गावांमध्ये शेतीपिके, शेतजमीन नुकसान, विहिरीचे, घरांचे पंचनामे करण्यासाठी आदेश देऊन पंचनामा भरपाई प्रक्रिया पूर्ण केली. महाबळेश्वर तालुक्यातील ८१ गावांमध्ये पाच हजार ९३६ बाधित शेतकऱ्यांचे एक हजार ७३१ हेक्टर, तर वाई तालुक्यातही ३२ गावांमधील २०८ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे.

शेतजमिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी जेसीबीधारकांना प्रशासनामार्फत मोफत इंधन देण्यात आले. खंडाळा तालुक्यातील ८४ जेसीबी, १० पोकलेन, ६ डंपर, ४ ट्रॅक्टर महाबळेश्वर येथे काम करण्यास तयार झाले आहेत.

खरिपापर्यंत पिकांची लागवड होणार 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक हजार ७३१ हेक्टर जमिनीपैकी मशिनद्वारे दुरुस्त होणारी अंदाजे ७५० ते ८०० हेक्टर क्षेत्र होते. यापैकी लोकसहभागातून मशिनद्वारे अंदाजे ५०० ते ५५० हेक्टर शेतजमीन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. बहुतांश ठिकाणी शेतजमीन दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात जमिनीमध्ये पुन्हा पिके लागवड करता येतील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com